लग्नानंतर Alia Bhatt या जवळच्या व्यक्तीला घेऊन गेली सासरी, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल!
Alia-Ranbir Wedding: आलिया भट्ट (Alia Bhatt) प्राणीप्रेमी आहे. आलियाकडे खूपच सुंदर कॅट आहे. या कॅटवर आलियाचे खूप प्रेम आहे. आलियाने आपल्या लाडक्या कॅटचे नाव एडवर्ड ठेवले आहे. या कॅटला घेऊन आलिया आपल्या सासरी गेली आहे. आलियाने लग्नामध्ये सुद्धा आपल्या कॅटला आणले होते. एडवर्डसोबतच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

Alia-Ranbir Wedding: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच विवाहबंधनात अडकले. आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल रोजी लग्न केले. दोघांचे लग्न होऊन आता दहा दिवस झाले तरी सुद्धा त्यांच्या लग्नाची अजुनही चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर (Social Media) आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे (Alia-Ranbir Wedding) फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आलिया भट तिच्या आवडत्या खास व्यक्तीसोबत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या खास व्यक्तीला आलिया भट्ट लग्नानंतर आपल्या सासरी घेऊन गेली. ही खास व्यक्ती कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल. ती व्यक्ती कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
Also Read:
आलिया भट्टचा व्हायरल होणाऱ्या या फोटोला खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे मात्र दोघांनीही हनिमूनला जाण्याऐवजी आपापल्या कामावर परतण्याचा निर्णय घेतला. रणबीर मनालीमध्ये ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर आलिया भट्टही तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये मिसेस कपूर खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
आलिया भट्ट प्राणीप्रेमी आहे. आलियाकडे खूपच सुंदर कॅट आहे. या कॅटवर आलियाचे खूप प्रेम आहे. आलियाने आपल्या लाडक्या कॅटचे नाव एडवर्ड ठेवले आहे. या कॅटला घेऊन आलिया आपल्या सासरी गेली आहे. आलियाने लग्नामध्ये सुद्धा आपल्या कॅटला आणले होते. एडवर्डसोबतच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. आलियाने याआधी देखील एडवर्डसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, आलियाने लग्नात सब्यसाचीने डिझाइन केलेली पांढरी साडी परिधान केली होती. याशिवाय तिने सोन्याचे दागिनेही घातले होते. याआधीही आलिया-रणबीरच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत. अशामध्ये तिने पोस्ट केलेले हे काही फोटो खूपच सुंदर आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या