Top Recommended Stories

Deepika Padukoneला वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता 'ब्रेस्ट इम्प्लांट'चा सल्ला, म्हणाली...

Bollywood Actress Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या एका सल्ल्याने ती खूप प्रभावित झाली. इतकेच नाही तर दीपिकानेही किंग खानचा हा सल्ला आपल्या आयुष्यात पाळत आहे.

Updated: February 28, 2022 4:28 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Deepika Padukone
Deepika Padukone

Bollywood Actress Deepika Padukone : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘गहराइयां’ (Gehraiyaan) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. प्रेक्षकांकडून देखील या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच दीपिका पादुकोणने फिल्मफेअरला (Filmfare) एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिच्या आयुष्यातील एक वाईट आणि एक चांगल्या सल्ल्याबद्दल विचारण्यात आले होते. दीपिकाने यावेळी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Actor Shahrukh Khan) एका सल्ल्याने ती खूप प्रभावित झाली आहे. इतकेच नाही तर दीपिकानेही किंग खानचा हा सल्ला आपल्या आयुष्यात पाळला. शाहरुख म्हणाला होता की, ‘नेहमी अशा लोकांबरोबर काम केले पाहिजे ज्यांना आपण ओळखतो. त्यामुळे या लोकांसोबत वेळ चांगला जाईल. कारण आपण नुसता चित्रपट करत नसतो तर आपले आयुष्य जगत असतो’

दीपिकाने या मुलाखतीमध्ये तिला मिळालेल्या एका वाईट सल्ल्याबद्दल सांगितले. दीपिका म्हणाली की, ‘मला वयाच्या 18व्या वर्षी सर्वात वाईट सल्ला मिळाला होता. मला ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण सुदैवाने मी तो गांभीर्याने घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा ब्रेस्ट इम्प्लांट केले नाही.’ दीपिकाला आलेल्या या भंयकर अनुभव तिने शेअर केल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत झाले.

You may like to read

दरम्यान, ‘गहराइयां’ हा चित्रपट खूपच चांगला आहे. या चित्रपटात प्रेम, द्वेष, सत्य, खोटे, लोभ, नातेसंबंधांमधील तळमळ याबद्दल दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा आहे. जो गुंतागुंतीच्या नातेसंबंधांमध्ये खोलवर बुडलेला आहे आणि जीवनाचा मार्ग नियंत्रित करतो. चित्रपट निर्णय आणि त्याचे परिणाम याबद्दल दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट तुम्हाला स्वतःशी भावनिकरित्या जोडून ठेवतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.