मुंबई : ‘गँग्स ऑफ वासीपूर’, ‘एक थी डायन’, ‘बदलापूर’, ‘डेढ इश्किया’, ‘डॉली एलएलबी २’ बॉलिवूडच्या (Bollywood) या सुपरहिट चित्रपटांमधून (Superhit movies) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री हुमा कुरेशी (Actress huma qureshi) सध्या ‘महाराणी’ वेबसीरिजमुळे (Maharani Webseries) चर्चेत आहे. आपल्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये हुमा कुरेशीने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हुमा कुरेशीने नुकताच बोल्ड फोटोशूट (Huma qurexhi bold photoshoot) केले आहे. सोशल मीडियावर हुमा कुरेशीचे हे फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंमधील हुमा कुरेशीच्या नव्या अवताराने सर्वांची झोप उडवून टाकली आहे.Also Read - बॉलिवूड अभिनेत्री Sharwari Wagh च्या साडीमध्ये दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा!
हुमा कुरेशी सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) करत असते. हुमा कुरेशीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. सध्या हुमा कुरेशीने इन्स्टाग्रामवर (Huma qureshi instagram) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हुमाचा बोल्ड अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे. हुमा कुरेशीने ऑलिव्ह ग्रीन कलरचा (Olive green colour) स्विमसूट (Swimsuit) घातला असून यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे. Also Read - Sharad Ponkshe आणि Aadesh Bandekar यांचे सोशल मीडिया वॉर, पोस्ट करत म्हणाले - 'मी कधीही काहीही विसरत नाही'
Also Read - Viral Video : बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 4 जणांचा मृत्यू तर 300 जखमी, धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल!
हुमा कुरेशीच्या या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान चांगलंच वाढलं आहे. नेटिझन्स तिच्या सिजलिंग अंदावर फिदा झाले आहेत. या फोटोंवर हुमाचे चाहते भरभरुन कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तसंच, हुमा कुरेशीच्या या फोटोंना एक लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, हुमा कुरेशीने 2012 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने सर्वात आधी अनुराग कश्यप (anurag kashyap) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर-1’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील हुमाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हुमा कुरेशीने पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर (digital platforms) पदार्पण केले आहे. तिची ‘महाराणी’ वेबसीरिज नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या वेबसीरिजमध्ये हुमाने दमदार अभिनय केला आहे.