Jacqueline Fernandez आणि Sukesh Chandrashekhar किस करताना दिसले, लव्ह बाइटचा फोटो होतोय व्हायरल!

या दोघांच्या काही रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियावरचे तापमान वाढवले आहे.

Updated: January 9, 2022 10:09 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Jacqueline Fernandez- Sukesh Chandrashekhar
Jacqueline Fernandez- Sukesh Chandrashekhar

Jacqueline Fernandez Romantic Pictures With Sukesh Chandrashekhar : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखरमुळे (Sukesh Chandrashekhar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेशसोबत जोडले गेले आहे. दोघांचेही अनेक फोटो आणि चॅट सोशल मीडियावर (Social Media) लीक झाले आहेत. जॅकलीन फर्नांडिसला डिसेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 दरम्यान सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. ज्यावर जोरदार वाद सुरु आहे. जॅकलीन फर्नांडिसला हिऱ्याच्या दोन कानातले, दोन ब्रेसलेट, लुईस बटनचे शूज, 9 लाख किमतीच्या चार मांजरी आणि 56 लाख किमतीचे घोडे अशा वस्तू सुकेशने भेट दिल्या आहेत. यासोबतच या दोघांचे काही रोमँटिक आणि किसिंग फोटोही व्हायरल झाले होते. जे पाहून सर्वांना मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा दोघांच्या काही रोमँटिक फोटोंनी (Romantic Photo) सोशल मीडियावरचे तापमान वाढवले आहे.

Also Read:

जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या अफेअरमुळे (Jacqueline Fernandez And Sukesh Chandrashekhar Love Affair) चर्चेत आहे. आतापर्यंत त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा त्यांचा जो फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे त्या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजमध्ये दिसत आहेत. जॅकलिन आणि सुकेश यांचा बेडवरील फोटो आहे. या फोटोत सुकेश जॅकलिनला किस करताना दिसत आहे. या फोटोमध्ये जॅकलिनच्या गळ्याजवळ एक लव्ह बाईटसुद्धा दिसत आहे. यावरुन या दोघांचे नाते किती जवळचे आहे हे या फोटोतून स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये सुकेश चंद्रशेखर जॅकलिन फर्नांडिसच्या नाकावर चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आली आहे.

सुकेश चंद्रशेखरने यापूर्वी खुलासा केला होता की, तो जॅकलिन फर्नांडिसला डेट करत आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्यावर 220 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखर यांनीही मनी लाँड्रिंगच्या कमाईतून जॅकलिन फर्नांडिसवर 25 ते 30 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला 56 लाखांचा घोडा, कोट्यवधीची वाहने आणि अनेक महागडे दागिने देण्यात आली आहेत. सुकेश चंद्रशेकर 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलिन फर्नांडिसची दोन वेळा चौकशी केल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 10:00 AM IST

Updated Date: January 9, 2022 10:09 AM IST