Kangana Ranaut Trolled: या कृत्यामुळे कंगणा राणावत सोशल मीडियावर ट्रोल, यूजर म्हणाला - 'कोरोनाचा कहर वाढवल्याबद्दल धन्यवाद'
कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Kangana Ranaut Trolled : बॉलिवूडची (Bollywood) ‘ड्रामा क्वीन’ कंगना राणावत (Actress Kangana Ranaut) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. यामुळे सोशल मीडियावर (Social Media) कंगना राणावतला नेहमी ट्रोल (Kangana Ranaut Troll on Social Media) केले जाते. नुकतेच कंगना राणावतने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेवर आपले मत मांडले होते. कंगना राणावतचा यासंदर्भातला व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत असून यावरुन कंगनाचे चाहते चांगलेच संतापले आहेत. ते तिला ट्रोल करुन सत्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता कंगना राणावतचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन देखील तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आले आहे.
Also Read:
View this post on Instagram
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर (Bollywood Celebrity Photographer) विरल भय्यानीने (Viral Bhayani) कंगनाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्लेटमधून पेस्ट्री घेते तोंडाजवळ घेऊन जाते. तोंड उघडते पेस्ट्री खाण्याची पोज देते आणि परत ती पेस्ट्री त्या प्लेटमध्ये ठेवते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले – ‘ब्रिलियंट आधी तिने पेस्ट्रीला स्पर्श केला, नंतर त्याचा वास घेतला आणि नंतर त्याला प्लेटमध्ये ठेवले, आता त्याला कोणीतरी दुसरे खाईल.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले – ‘कोरोनाच्या वेळी कंगना हे कृत्य करतेय हे आश्चर्यकारक आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ही काय पद्धत आहे कोरोनाच्या काळात असे कोण करतं.’ तर आणकी एका युजरने लिहिले आहे की, ‘कोरोनाचा कहर वाढवल्याबद्दल तुमचे धन्यवाद’.’ अशाप्रकारच्या कमेंट्स करत कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या