Kriti Sanon नं गुपचूप केलं लग्न? नवरीच्या पोषाखात फोटो झाले Viral, चाहत्यांना बसला धक्का
लाल रंगाच्या घागऱ्यातील कृतिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कृतिनं गुपचूप लग्न तर केलं नाही ना, अशा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

मुंबई: ‘हीरोपंती’ (Heropanti) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी एक्ट्रेस कृति सेनन (Kriti Sanon) सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिमी’ (Mimi) वरून सध्या चर्चेत आहे. एरव्ही आपलं सौंदर्य आणि अभिनयानं लाखो चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या कृतिनं नवरीच्या पोषाखात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Also Read:
लाल रंगाच्या घागऱ्यातील कृतिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कृतिनं गुपचूप लग्न तर केलं नाही ना, अशा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
View this post on Instagram
कृति सेनन हिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यात कृति नव्या नवरीप्रमाणं नटली आहे. तिनं लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. इतकंच नाही तर तिच्या कपाळावर कुंकू आहे. नाकात नथ, गळ्यात हार आहे. यामुळे कृतिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. नवरीप्रमाणे श्रृंगार केल्यानंतर कृति एक अप्सरा दिसते आहे. कृतिच्या या ब्राइडल लूकवर नेटिजन्स भरभरून रिएक्ट करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, कृतिचं लग्न वैगेरे झालेलं नाही. कृतिचे फोटो मनीष मल्होत्रा यांच्या फॅशन फोटोशूटची आहेत. कृतिनं परिधान केलेला लाल घागरा बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे.
कृति सेनन या आधी दिलवाले, बरेली की बर्फी, स्त्री, कलंक, लुका छुपी सारख्या अनेक चित्रपटात दिसली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या