Top Recommended Stories

Malaika Aroraने केले स्टनिंग फोटोशूट, दिलखेच अदा पाहून व्हाल घायाळ!

Malaika Arora Photoshoot : मलायका अरोराने नुकताच स्टनिंग फोटोशूट केले. या फोटोंच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा चाहत्यांना इम्प्रेस केले आहे.

Updated: January 20, 2022 9:41 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Malaika Arora
Malaika Arora

Malaika Arora Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल मलायका अरोरा (Model Malaika Arora) आपल्या फोटोशूट (Malaika Arora Photoshoot) आणि फिटनेसने फॅन्सला वेड लावल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असणारी मलायका अरोरा तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. तसंच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Malaika Arora Photo Viral) सुद्धा होत असतात. मलायका अरोराने नुकताच स्टनिंग फोटोशूट (Stunning Photoshoot) केले. या फोटोंच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा चाहत्यांना इम्प्रेस केले आहे.

Also Read:

You may like to read

लूक्स मॅगझिनसाठी (Looks Magazine) मलायका अरोराने फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे व्हिडिओ (Malaika Arora Photoshoot Video) आणि काही फोटो मलायकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Malaika Arora Instagram Video) शेअर केले आहे. या फोटोशूटसाठी मलायकाने अतिशय सुंदर असे पाच ड्रेस घातले आहेत. मलायका अरोराने हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘माझा हा सुपर सेक्सी लूक 2022’ असे लिहिले आहे. मलायका अरोरा पहिल्यांदाच लूक्स मॅक्झिनच्या कव्हरमध्ये दिसणार आहे.

व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला मलायका अरोराने व्हाईट कलरचा ड्रेस घातल्याचे दिसत आहे. हा ड्रेस ब्राऊन कलरच्या फ्लोरल लूकने डिझाइन करण्यात आला आहे. या ड्रेससोबत मलायकाने ज्वेलरी घातली नाही तर हॉट रेड कलरची लिपिस्टिक लावली आहे. या ड्रेससोबत मलायकाने कर्ली हेअर ठेवत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाने आणखी एक सुंदर ड्रेस घातला आहे. आपल्या स्टाइलला फ्लॉन्ट करत मलायकाने सिल्व्हर कलरचा ड्रेस घातला आहे. ड्रेसला लूक देण्यासाठी तिने स्वत:ला फेदरने कव्हर केले आहे. मलायकाने ड्रेससोबत ग्रे कलरचे हिल्स घातले आहेत आणि गळ्यामध्ये हॅवी नेकलेस घातला आहे.

व्हि़डिओत मलायकाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसच्या साइडला फेदर लावून ड्रेसला आणखी सुंदर लूक देण्यात आला आहे. या गाऊनसोबत मलायकाने न्यूड मेकअप केला असून टिआरासोबत फोटोशूट केले आहे. मलायकाने आणखी एक अतिशय सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिने लाईट पर्पल कलरचा ड्रेस घातलेला फोटो शेअर केला आहे. या ड्रेससोबत मलायकाने हॅवी ज्वेलरी घातली आहे. मलायकाचे हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर प्रसाद नायक (Photographer Prasad Nayak) याने काढले आहेत. या व्हिडिओतील एकापेक्षा एक सुंदर आऊटफिट उत्तम घोष (Uttam Ghosh) यांनी डिझाइन केले आहे. मलायकाचा हेअर आणि मेकअप नम्रता सोनी (Namrata Soni) यांनी केला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 9:41 AM IST

Updated Date: January 20, 2022 9:41 AM IST