बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंदिराचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) याचं बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. पतीचं अकाली निधन झाल्यामुळे मंदिरा खूप हादरली आहे. बॉलिवूडमधील सेलेब्स सोशल मीडियाच्या माध्यमातून राज कौशल (Raj Kaushal) यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दुसरीकडे, सेलेब्स मोठ्या संख्येनं मंदिरा बेदीच्या (Mandira Bedi) घरी पोहोचले आहेत. ते मंदिराचं सांत्वन करत आहेत.
Also Read - बर्थडेला तोकडे कपडे परिधान करून मंदिरा बेदीनं केली जबरदस्त पार्टी, Video क्षणात व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कौशल (Raj Kaushal) यांना बुधवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांला वांद्रे येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच राज यांची प्राणज्योत मालवली.

बांद्रे येथील राहत्या घरापासून राज यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक सेलेब्स उपस्थित होते. त्यात अपूर्व अग्निहोत्री, हुमा कुरैशी आणि समीर सोनी समावेश होता. मंदिरा बेदीवर मोठं दु:ख कोसळलं आहे. ती रोनित रॉयच्या खांद्यावर डोकं ठेऊन ढसाढसा रडताना दिसत आहे.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 1999 मध्ये लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांना मुलगा वीर याचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी राज आणि मंदिरा यांनी 4 वर्षांच्या मुलगी दत्तक घेतली होत . तारा असं तिचं नाव आहे.

राज कौशल एक निर्माता आणि स्टंट डायरेक्टर होते. त्यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर ‘माय ब्रदर निखिल’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘प्यार में कभी-कभी’ या चित्रपटांची निर्मितीही त्यांचीच केली होती.

Mandira Bedi’s teary goodbye to husband Raj Kaushal
