Top Recommended Stories

Mouni Roy Suraj Nambiar Wedding: मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत अडकली विवाहबंधनात, सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल!

Mouni Roy Suraj Nambiar Wedding: 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Updated: January 27, 2022 1:12 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Mouni Roy Suraj nambiar Wedding Pictures Viral
Mouni Roy Suraj nambiar Wedding Pictures Viral

Mouni Roy Suraj Nambiar Wedding : बॉलिवूड  (Bollywood ) अभिनेत्री मौनी रॉय (Actress Mouni Roy) अखेर बॉयफ्रेड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) विवाहबंधात अडकली आहे. 27 जानेवारी म्हणजे आज मौनी आणि सुरज यांचा विवाहसोहळा (Mouni Roy And Suraj Nambiar Wedding) गोव्यामध्ये (Goa) पार पडला. मौनी आणि सूरजने गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेंडिग केले. या खास विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. या विवाहसोहळ्याला मौनी रॉयच्या अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्सनी उपस्थिती लावली.

Also Read:

You may like to read

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या लग्नापूर्वीचा विधी कालपासून सुरु झाला होता. तिच्या हळदीचे (Mouni Roy Haldi) आणि मेहंदीचे (Mouni Roy Mehendi) फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photos Viral On Social Media) झाले होते. त्यानंतर आता ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत. यासोबत मौनीने तिचा पती सूरजसोबतचा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. मौनी आणि सूरज यांच्या लग्नांचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तिच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांना प्रचंड आनंद झाला असून ते दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर मानव मंगलानीने (Manav Manglani) मौनी रायच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनी रॉयचा नवरा सूरज हा दक्षिण भारतीय आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण लग्न दक्षिण भारतीय (South Indian) पद्धतीने पार पडले. मौनी दक्षिण भारतीय वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत होती. यावेळी मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. गळ्यामध्ये सोन्याचा हार आणि कपाळावर टिकलीत मौनीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते. तर सूरजने पांढऱ्या रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला होता.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या हळदी आणि मेहंदीला अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अर्जुन बिजलानी, आश्का गोराडिया आणि मंदिरा बेदी यांनी हजेरी लावली होती. मौनीच्या हळदी आणि मेहंदी सोहळ्याचे काही फोटो अर्जुन बिजलानी आणि मंदिरा बेदी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. दरम्यान, मौनी रॉयबद्दल सांगायचे झाले तर, मौनी रॉय ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तर सूरज नांबियार हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दरम्यान, मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मौनी लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 1:12 PM IST

Updated Date: January 27, 2022 1:12 PM IST