मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Bollywood Actress Neha Dhupia) दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या ती प्रेग्नेंसी टाइम (Pregnency Time) इन्जॉय करत आहे. प्रग्नेंट असताना सुद्धा नेहा धुपिया फोटोशूट (Neha Dhupia Photoshoot) करण्याची एकही संधी सोडत नाही. नेहा धुपियाने आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेहा धुपियाने नुकताच बेबीबंपसह (Neha Dhupia Baby Bump) फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो (Photo Viral) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.Also Read - Oscars 2022: 'शेरनी' आणि 'सरदार उधम सिंह' चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट!

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

Also Read - RIP Chandrakant Pandya: 'रामायणा'तील निषाद राजानं घेतला जगाचा निरोप, राम-सीतानं व्यक्त केलं दु:ख!

नेहा धुपियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Neha Dhupia Instagram Account) बिकिनीमधील काही फोटो पोस्ट केले आहे. ब्लॅक कलरच्या या बिकिनीमध्ये नेहा धुपिया आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये नेहा धुपियाने पूल सेशनची झलक दाखवली आहे. या फोटोमध्ये नेहा धुपिया स्विमिंग पूलच्या (Swiming Pool) कडेला पोझ देताना दिसत आहे. या फोटोत तिने ब्लॅक कलरची बिकिनी आणि त्यावर सनग्लासेस घातले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये ‘दोन लोकांसाठी पूल पार्टी.’, असे लिहिले आहे. नेहाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. आतापर्यंत या पोस्टला एक लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. Also Read - Ananya Panday फक्त 12 वी पास, Aryan Khan सोबत पार्टीत अशी करायची मज्जा-मस्ती... पाहा Photo

सध्या नेहा धुपिया फक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत नाही तर आपल्या वर्कफ्रंटसाठी (Workfront) देखील खूपच सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अलिकडेच नेहा तिचा आगामी ‘सनक’ चित्रपटासाठी डबिंग करताना दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट बेहजाद खंबाटा यांनी लिहिला आहे. त्यासोबतच तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. नेहा धुपियाच्या या आगामी चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.