Top Recommended Stories

Priyanka Chopra आणि Nick Jonas झाले आई-बाबा, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Priyanka Chopra And Nick Jonas Welcome A Baby : प्रियंका चोप्राच्या या पोस्टला खूप चांगली पसंती मिळत आहे. पण प्रियंका आणि निकने छोटा पाहुणा मुलगा आहे की मुलगी हे सांगितले नाही.

Updated: January 22, 2022 10:40 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Priyanka Chopra Jonas Celebrates Diwali With Nick in London, Shares a Loved-up Picture
Priyanka Chopra and Nick Jonas (Photo Courtesy: Instagram/@priyankachopra)

Priyanka Chopra And Nick Jonas Welcome A Baby : बॉलिवूडची (Bollwood) ‘देसी गर्ल’ (Desi Girl) अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) गुड न्यूज दिली आहे. प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास (Priyanka Chopra-Nick Jonas) आई-बाब झाले आहेत. प्रियंका आणि निक जोनासच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे सगळे जण आनंदित झाले आहेत. प्रियंका आणि निकने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Also Read:

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

You may like to read

प्रियंका चोप्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन (Priyanka Chopra Instagram) गुड न्यूज शेअर केली आहे. तिने असे लिहिले आहे की, ‘आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आम्ही एका मुलाचे सरोगेटद्वारे स्वागत केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्यामुळे या विशेष काळात आम्ही आदरपूर्वक गोपनीयता शोधतो. खूप खूप धन्यवाद.’ प्रियंका चोप्राच्या या पोस्टला खूप चांगली पसंती मिळत आहे. पण प्रियंका आणि निकने छोटा पाहुणा मुलगा आहे की मुलगी हे सांगितले नाही.

प्रियंका आणि निक आई-बाबा झाल्याचे कळाल्यावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. प्रियंकाच्या या पोस्टवर भरभरुन कमेंट्स केल्या जात आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रियंका आणि निकला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Kureshi), पूजा हेगडे (Pooja Hegade), लारा दत्ता (Lara Dutta) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रियंका आणि निकचे अभिनंदन केले आहे.

प्रियंका चोप्रा ही फक्त बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल स्टार (Global Star) झाली आहे. प्रियंकाने फक्त बॉलिवूडमध्येच (Bollywood) नाही तर हॉलिवूडमध्येही (Hollywood) आपलं नाव कमावलं आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह 2018 मध्ये झाला. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिलेले हे दांपत्य आता आई-बाबा झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रियंका चोप्राने निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केल्यापासून ती भारताबाहेरच राहत आहे. सध्या ती सात समुद्रपार असलेल्या लॉस एंजेलिसमध्ये आपल्या पतीसोबत राहते.

दरम्यान, सरोगसीच्या पर्यायाची निवड करून बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आई-बाबा झाले आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींनी सरोगसीचा पर्याय निवडला आहे. या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), शाहरूख खान (Shahrukh Khan), आमिर खान (Aamir Khan), तुषार कपूर (Tushar Kapoor), एकता कपूर (Ekata Kapoor), करण जोहर (Karan Johar) यांचा समावेश आहे. आता या यादीत आता प्रियांका चोप्रा-निक जोनास या दांपत्याचाही समावेश झाला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 22, 2022 8:36 AM IST

Updated Date: January 22, 2022 10:40 AM IST