मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नुकताच कोर्टाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळत त्याच्या कोठडीत 15 दिवसांची वाढ केली आहे. यातच आता त्याच्यावर बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे.Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

Also Read - Neha Dhupia Baby Bump: नेहा धुपियाने बिकनीमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, फोटो शेअर करत म्हणाली...

शर्लिन चोप्राने क्राईम ब्रँचला (Mumbai Crime Branch) तिच्यावर राज कुंद्राने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली आहे. शर्लिन चोप्राने राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. शर्लिन चोप्रा नेहमी चर्चेत असते. तिने 14 एप्रिल 2021 रोजी राज कुंद्राविरोधात तक्रार (FIR Against Raj Kundra) दाखल केली होती. या तक्रारीमध्ये तिने असा खुलासा केला होता की, 2019 मध्ये राज कुंद्राने तिच्या बिझनेस मॅनेजरला एका प्रोपजलवर (Business Praposal) चर्चा करण्यासाठी बोलावले होते. 27 मार्च 2019 रोजी बिझनेस मिटिंगनंतर (Business Meeting) राज कुंद्रा न सांगता माझ्या घरी आला.’ Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

या तक्रारीत तिने पुढे असे म्हटले की, ‘त्यावेळी राजने मला जबरदस्ती किस (Kiss) करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी विरोध करत होती. पण राज थांबत नव्हता. त्यामुळे मी खूप घाबरले. मी त्याला धक्का दिला आणि वॉशरुममध्ये (Washroom) पळत गेली. राज माझ्या घरातून निघून जात नाही तोपर्यंत मी वॉशरुममध्येच होते.’ तिचे असे म्हणणे आहे की, एका विवाहित पुरुषाशी मला संबंध ठेवायचे नव्हते. तसेच बिझनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचे नव्हते. दरम्यान, शर्लिन चोप्राची ही तक्रार मुंबई क्राईम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.