मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra Arrested) अश्लिल फिल्म बनवणे आणि त्या काही अँपवर पब्लिश केल्याप्रकरणी (Pornography Case) अटक झाली आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टीच्या मागे देखील शुक्लकाष्ठ लागलं आहे. आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर (Sunanda Shetty) कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

‘Zee24 तास’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोसिस स्लिमिंग स्किन सलून आणि स्पा
(Iosis Slimming Skin Salon and Spa) नावाने शिल्पा शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांनी कंपनी सुरू केली आहे. याची शाखा नवी दिल्लीत खोलण्याच्या नावावरून अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला होता. स्पा सेंटर देण्याच्या नावावरून दोन्ही मायलेकींनी कोट्यवधी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. Also Read - Terror Module: मुंबईच्या जोगेश्वरीमधून सातवा संशयित दशतवादी ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

कोणी केली तक्रार?

स्पा सेंटर देण्याच्या नावावरून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ज्योत्स्ना तौहान (रा.ओमेक्स हाइट्स) यांनी विभूतिखंड पोलिस स्टेशनमध्ये तर रोहित सिंह यांनी हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी हजरतगंज पोलिस स्टेशनमधून एका महिन्यापूर्वी शिल्पा शेट्टीसह तिच्या आईला नोटीस बजावण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांची या प्रकरणात नेमकी भूमिका आहे, हे तपासण्यासाठी हजरतगंज पोलिसांचं एक विशेष पथक मुंबईत पोहोचलं आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांना कोणत्याही क्षणी अटक केलं जाऊ शकतं, अशी माहिती मिळाली आहे. Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

तक्रारदार ज्योत्स्ना चौहान यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये विभूतीखंड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. वेलनेस सेंटर सुरू करण्यासाठी आयोसिस कंपनीच्या किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इशरफिल, नवनीत कौर, आशा, पूनम झासह अनेकांवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रॅंचनं 19 जुलैला अटक केली होती. त्यानंतर पीडितेनं पोलिसांना आपबिती सांगितली आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.