मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography Case) न्यायालयीन कोठडीमध्ये (Judicial custody) आहे. नवरा राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पा शेट्टी चिंतेत आहे. पतीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ती कॅमेऱ्यासमोर आली आहे. नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने तिचा प्रसिद्ध रियालिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मधून (Super Dancer-4) ब्रेक घेतला होता. पण आता शिल्पा शेट्टीने या शोमध्ये पुनरागमन केले आहे.Also Read - Raqesh And Shamita Dinner Date: राकेश बापटने अखेर वचन केले पूर्ण, शमिता शेट्टीला डिनर डेटवर गेला घेऊन!

शिल्पा शेट्टी या शोसाठी तयार होऊन सेटवर शुटिंगसाठी जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty Video) हलक्या निळ्या रंगाची साडी नेसली आहे. शिल्पा शेट्टी तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडते आणि सरळ सेटच्या दिशेने निघून जाते. ती कॅमेऱ्याकडे देखील पाहत नाही. Also Read - Viral Video: कौतुकास्पद! भिंत कोसळताना पाहून आईने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचे असे वाचवले प्राण!

Also Read - Nora Fatehis Bold Look: नोरा फतेहीचा व्हाईट कट आऊट ड्रेसमध्ये जलवा, फोटो पाहून चाहते घायाळ!

प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानीने (Viral Bhaiyani) शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ (Viral Video) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) पोस्ट केला आहे. नेहमी शिल्पा शेट्टी कॅमेरा समोर आल्यानंतर त्याच्याकडे पाहून पोज देते किंवा काही तरी प्रतिक्रिया देते. पण या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी शांतपणे सेटकडे जाताना दिसत आहे. दरम्यान, शिल्पाचा नवरा राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai police Crime Branch) 19 जलै रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

रम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर 19 जुलैला त्याला अटक (Raj Kundra Arrested) करण्यात आली. याप्रकरणी राज कुंद्राचा सहकारी रायन (Rayan) याला देखील क्राईम ब्रँचने अटक केली आहे. दोघांनीही जामीनासाठी याचिका (Petition for bail) दाखल केली होती. पण 7 ऑगस्टला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज कुंद्रा आणि रायन यांची जामीन याचिका फेटाळून लावली. दोघेही सुरुवातीला पोलीस कोठडीत होते पण आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत.