मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Bollywood Actress Shilpa Shetty) सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography Case) अटक करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून तो तुरुंगात आहे. अशा परिस्थितीत शिल्पा आता हळूहळू तिचे आयुष्य सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा तिचा प्रसिद्ध डान्स रियालिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’मध्ये (Super Dancer-4) जजच्या भूमिकेत परत आली. पण तिचा पती राज कुंद्राच्या या कृत्यामुळे लोकांनी तिला माफ केले नाही. नेटिझन्सनी राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीवर देखील जोरदार टीका केली आहे.Also Read - Shilpa Shetty कंफ्यूज? आयुष्याबाबत मोठा निर्णय घेताना सोशल मीडियावर मागितला सल्ला

Also Read - Drugs Case: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या भावाला ड्रग्ज प्रकरणी अटक!

शिल्पा शेट्टीला सध्या नवऱ्याच्या कृत्यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अलिकडेच ती एका टॉक शोमध्ये (Talk Show) सहभागी झाली होती. या शोमध्ये ती कंटेंट क्रिएटर बी यू निकसोबत (Content Creater) सहभागी झाली होती. या शोचा प्रोमो समोर आल्यानंतर नेटिझन्स शिल्पा शेट्टीला ट्रोल करु लागले आहेत. यामागचे कारण म्हणजे या शोमध्ये शिल्पा खूप मस्ती करताना आणि हसताना दिसत आहे. Also Read - Raqesh And Shamita Dinner Date: राकेश बापटने अखेर वचन केले पूर्ण, शमिता शेट्टीला डिनर डेटवर गेला घेऊन!

शिल्पा शेट्टीचे हे मोठमोठ्याने हसणे पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत. त्यांनी तिच्यावर टीका करताना असे म्हटले आहे की, ‘कोणत्या गोष्टीवर तू हसत आहे. तुझ्या नवऱ्याने दुसऱ्या महिलांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. कोणी इतकं निर्लज्ज कसे होऊ शकते?’ दरम्यान, शिल्पाचा नवरा राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai police Crime Branch) 19 जलै रोजी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर 19 जुलैला त्याला अटक (Raj Kundra Arrested) करण्यात आली. याप्रकरणी राज कुंद्राचा सहकारी रायन (Rayan) याला देखील क्राईम ब्रँचने अटक केली आहे. दोघांनीही जामीनासाठी याचिका (Petition for bail) दाखल केली होती. पण मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज कुंद्रा आणि रायन यांची जामीन याचिका फेटाळून लावली. दोघेही सुरुवातीला पोलीस कोठडीत होते पण आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत.