नव्या वर्षाची सरुवात होताच Shilpa Shettyने पतीसोबत घेतले साईबाबांचे दर्शन, फोटो पोस्ट करत म्हणाली...

शिल्पा शेट्टीने पतीच्या सुटकेनंतर पहिल्यांदाच त्याच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Updated: January 6, 2022 1:36 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

shilpa shetty trolled for visit shirdi sai mandir with raj kundra people asked inhe samne lane ke kya jarurat the
shilpa shetty trolled for visit shirdi sai mandir with raj kundra

Shilpa Shetty With Raj Kundra: पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Bollywood Actress Shilpa Shetty) मोठा धक्का बसला होता. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा या प्रकरणातून जेलमधून बाहेर आला आहे. या प्रकरणाच्या मानसिक धक्क्यातून शिल्पा शेट्टी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरु असून ती आता करिअरकडे फोकस करत असल्याचे दिसत आहे. नुकताच नवीन वर्षाची सुरुवात झाली असून शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रसोबत शिर्डीच्या साईबाबाचे (Shirdi Saibaba) दर्शन घेतले आहे.

Also Read:

शिल्पा शेट्टीने पतीच्या सुटकेनंतर पहिल्यांदाच त्याच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Shilpa Shetty Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेत असताना दिसत आहे. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली पोस्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिल्पाने राज कुंद्रासोबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहेत. या व्हिडिओला काही नेटिझन्सनी पसंती दिली तर काही नेटिझिन्सनी शिल्पा शेट्टीला ट्रोल सुद्धा केले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये ‘सबका मालिक एक, श्रद्धा और सबुरी. ओम साई राम.’ असे लिहिले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘कोरोनाच्या काळात (Corona Virus) यांना मंदिरात जाण्याची परवानगी कशी मिळाली? तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘त्याला समोर आणण्याची काय गरज होती. तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘हे मंदिरात फोटोग्राफी करू शकतात. आम्ही नाही.’ दरम्यान, मागच्या वर्षी शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी मसुरीला गेली होती. तिने इन्स्टाग्रामला अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल (Shilpa Shetty Workfront) सांगायचे झाले तर, लवकरच शिल्पा शेट्टी शब्बीर खानच्या ‘निकम्मा’ चित्रपटातून (Nikamma Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेठिया मुख्य भूमिकेत आहेत. तिचा ‘हंगामा 2’ चित्रपट (Hungama 2 Movie) काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तिने बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 1:35 PM IST

Updated Date: January 6, 2022 1:36 PM IST