मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) नुकताच मुंबईत आलिशान घर खरेदी केले. सनी लिओनीने पती डॅनियल वेबर (Daniel Weber) आणि आपल्या तीन मुलांसोबत नुकताच या घरामध्ये एन्ट्री घेतली. सोशल मीडियावर (Social Media) सनीच्या आलिशान घराचे (Sunny Leone New Home) फोटो व्हायरल (Photo viral) होत आहेत. तिच्या घराचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकीत व्हाल. हे फोटो पाहून हे स्पष्ट दिसून येत आहे की सनीचे हे नवीन घर खूपच सुंदर आहे. सनीने हे घर घेतलं होतं तेव्हा त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.Also Read - Taapsee Pannu Birthday Special: अभिनेत्री होण्याआधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती तापसी पन्नू, असा राहिला तिचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास!

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Also Read - Breaking News Live Updates: तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला, तरुणीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादात तिघांची हत्या

सनी लिओनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये सनीचा पती डॅनियल वेबरने तिला उचलून घेत गृहप्रवेश केला. दुसऱ्या फोटोमध्ये सनी आणि डॅनियलसोबत त्यांची तिन्ही मुलं गृहप्रवेश करताना दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये सनी आणि डॅनियल आपली तिन्ही मुलं निशा, नूह आणि अशेरसोबत जमिनीवर बसून पिझ्झा खाताना दिसत आहेत. Also Read - Kiara Advani Birthday Special: सलमान खानच्या सल्ल्याने कियाराने आपले नाव बदलले, चित्रपटात येण्यापूर्वी होती शिक्षिका!

नवीन घरामध्ये प्रवेश करतानाचे फोटो शेअर करत सनी लिओनीने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘…आणि इथं भारतात आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरु होत आहे, मला इथे बांधलेलं हे घर आणि जीवन खूप आवडत आहे आणि हे सुंदर घर आमच्या तिन्ही सुंदर मुलांसोबत केकवरील आइसिंगसारखे आहे…सतनामवाहेगुरु.’ दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सनी लिओनीने मुंबईत 5 बीएचके अपार्टमेंट (5 BHK Apartment) खरेदी केले आहे. अंधेरी वेस्टमध्ये (Andheri West) अटलांटिस नावाच्या बिल्डिंगमध्ये तिचे हे नवीन आलिशान घर आहे.