मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Actress Urvashi Rautela) फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. तिची ड्रेसिंग स्टाईल (Dressing Style) आणि तिच्याकडे असलेले कपड्यांचे कलेक्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडते. वेगवेगळ्या स्टाईलमधील कपड्यांमधील फोटोंनी उर्वशीचे इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) पूर्णपणे भरलेले पाहायला मिळते. कपड्यांवरुन उर्वशी अनेकदा ट्रोल (Troll) सुद्धा झाली आहे. पण कोण काय बोलते याचा तिला काहीच फरक पडत नाही. कधी वेस्टर्न लूकमधील (Western Look) तर कधी इंडियन लूकमधील (Indian Look) उर्वशी रौतेलाचे फोटो सोशल मीडियावर आग लावून टाकतात.Also Read - Kiara Advani ने ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये दिल्या सिजलिंग पोज!

Also Read - 'Ranveer VS Wild' या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार Ranveer Singh, म्हणाला - ' ‘फक्त दीपिकाच्या प्रेमामुळेच...'

सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असणारी उर्वशी रौतेला नेहमी आपले सुंदर फोटो शेअर करत असते. नुकताच तिने साडीतील काही सुंदर फोटो (Urvashi Rautela Saree Photos) शेअर केले आहे. उर्वशीच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. उर्वशीने मल्टीकलर कॉम्बिनेशनची साडी नेसली असून त्यावर सुंदर ज्वेलरी घातली आहे. उर्वशीचा हा अवतार तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. Also Read - पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि स्कर्टमध्ये Janhvi Kapoor चे हॉट फोटोशूट, फोटो पाहून चाहते फिदा!

उर्वशीने नेसलेल्या या सुंदर साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तिची ही साडी तयार करायलाच सहा महिन्यांचा कालावाधी लागला. विशेष म्हणजे या साडीची किंमत (Saree Price) ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. कारण तिच्या या साडीची किंमत हजारांमध्ये नाही तर लाखोंमध्ये आहे. उर्वशीची ही साडी 58 लाखांची आहे.

उर्वशीने इन्स्टाग्रामवर (Instagram) या साडीतील काही फोटो आणि व्हिडिओ (Photo and Video) पोस्ट केले आहेत. उर्वशी या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओला लाखोंच्यावर लाईक्स मिळाले आहेत. तर तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, पाटन पटोला साडी तयार करणे सोपं नाही. साडी तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही साडी सिल्कचा वापर करुन तयार केली जाते.