Top Recommended Stories

Remo D'Souzaच्या मेहुण्याने गळफास लावून केली आत्महत्या, रेमोची पत्नी भावनिक पोस्ट करत म्हणाली...

Remo Dsouzas Brother In Law Suicide : रेमो डिसूझाचा मेहुणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊ जेसन वॉटकिन्सने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Updated: January 21, 2022 9:49 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Remo D’Souza’s Brother-in-Law Jason Watkins Found Dead, Lizelle D’Souza Expresses Shock And Share Pics
Remo D’Souza’s Brother-in-Law Jason Watkins Found Dead, Lizelle D’Souza Expresses Shock And Share Pics

Remo Dsouzas Brother In Law Suicide : बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर रेमो डिसूझाच्या (Famous Bollywood choreographer and filmmaker Remo D’Souza) मेहुण्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 48 वर्षीय जेसन वॅटकिन्सने (jason savio watkins) राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे (Suicide) एकच खळबळ उडाली आहे. जेसनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिलमध्ये पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. जेसन वॅटकिन्सच्या आत्महत्येमुळे रेमो डिसूझाच्या पत्नीच्या (Remo Dsouzas Wife) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रेमोच्या पत्नीला भावाच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे.

Also Read:

रेमो डिसूझाचा मेहुणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊ जेसन वॉटकिन्सने आत्महत्या (jason savio watkins Suicide) का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जेसन वॅटकिन्सच्या निधनाने लिझेल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लिजेल डिसूझाने इन्स्टाग्रामवर (Lijel Dsouza instagram) भावाचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिने भावासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत का? तू माझ्यासोबत असं कसं करु शकतो? मी तुला कधीच माफ करणार नाही, असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये जेसन आईसोबत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘सॉरी आई, मी तुला फेल केले असे लिहिले आहे.’

You may like to read

जेसन वॅटकिन्स हा मुंबईतील मिल्लत नगर येथे राहत होता. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जेसनची प्रकृती बिघडल्याचेही सांगितले जात आहे. नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण ओशिवरा पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. जेसनच्या या निर्णयामुळे रेमो डिसूझा आणि पत्नी लिजेल डिसूझाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लिजेलच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यानंतर तिच्या भावाने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्यामुळे लिजेलला धक्का मोठा बसला आहे.

दरम्यान, जेसन वॅटकिन्स दीर्घकाळ चित्रपटसृष्टीशी (Fil Industry) संबंधित होता. रेमो डिसूझासोबत सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director ) म्हणून त्याने काम केले आहे. जेसनच्या मृत्यूला त्याच्या जवळच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी दुजोरा दिला आहे. त्याने घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना त्याचा मृतदेह दिसला. त्यांना मोठा धक्का बसला. मुंबई पोलिस (Mumbai Police) याप्रकरणाचा तपास करत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 21, 2022 9:48 AM IST

Updated Date: January 21, 2022 9:49 AM IST