ड्रामा क्वीन राखी सावंतनं भररस्त्यावर 'नागीण'सोबत केला Hot Dance,व्हायरल झाला Video
बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई: बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात राखी टीव्ही एक्ट्रेस एकता कपूरच्या (Ekta Kapoor) मालिकेत ‘नागीण’ बनलेल्या सुरभी चंदना (Surbhi Chandna) हिच्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे राखी आणि सुरभीनं भररस्त्यावर डान्स केला आहे. राखी आणि सुरभीचा डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Also Read:
सुरभी चंदना (Surbhi Chandna) व्हिडिओमध्ये सांगते की, ती जेव्हा दु:खी होते तेव्हा राखीचे सर्व इंटरव्ह्यू बघते. ‘राखीकडून तिला देशात सुरू असलेल्या सर्व बातम्या समजतात. त्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) ही सुरभीला तिचं ‘ड्रीम में एंट्री’या गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह करते. पाहाता पाहाता राखी आणि सुरभी भररस्त्यावर डान्स करू लागतात.
विशेष म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) ही सुरभीला (Surbhi Chandna) डान्स स्टेप्स शिकवते. सुरभी त्या फॉलो करते. आता राखी आणि सुरभीच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राखीचे फॅन्स व्हिडीओ पाहून रिएक्ट होत आहेत.
View this post on Instagram
राखी सावंतचं (Rakhi Sawant) नवं गाणं ‘ड्रीम में एंट्री’खूप हिट होत आहे. ती हे गाणं कायम गुणगुणते. राखी (Rakhi Sawant) नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सु्द्धा दिसली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या