मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) सुप्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर (singer Neha Kakkar) म्हणजे आजच्या तरुणाईच्या गळ्यातली ताईत आहे. नेहाच्या मधुर आणि सुरेल आवाजाने अक्षरश: सर्वांना वेड लावलं आहे. नेहाने गायलेलं प्रत्येक गाणं सुपरहिट (Superhit Songs) झाल्याशिवाय राहत नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सिंगर्समध्ये नेहा कक्करचे नाव घेतलं जातं. अगदी कमी वयामध्ये नेहाने यशाची अनेक शिखरं सर केली आहेत. खूप मेहनत करुन नेहाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर (Social Media) देखील नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे. नेहा कक्कर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच (Bollywood Celebrites) कोट्यवधींची मालकीन असून तिच्याकडे असलेल्या आलिशान घराची नेहमीच चर्चा होत असते.Also Read - Taapsee Pannu Birthday Special: अभिनेत्री होण्याआधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती तापसी पन्नू, असा राहिला तिचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास!

neha kakkar

neha kakkar

neha kakkar house

neha kakkar house

नेहा कक्कर 2006 साली टीव्ही रियालिटी शो ‘इंडियन आयडल 2’मध्ये (Indian Idol 2) सहभागी झाली होती. त्यानंतर नेहाने 2008 साली स्वत:चा ‘नेहा द रॉक स्टार’ (Neha the rockstar) अल्बम रिलीज केला होता. तिचा हा अल्बम मीत ब्रदर्स यांनी कम्पोज केला होता. त्यानंतर हळूहळू नेहाला प्रसिद्धी मिळत गेली. नेहाने बॉलिवूडमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांची गाणी तिने गायली आहेत. वेळेनुसार नेहाने आपली लाइफस्टाइल (Lifestyle) देखील चेंज केली. Also Read - Breaking News Live Updates: तिहेरी हत्याकांडमुळे सांगली जिल्हा हादरला, तरुणीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादात तिघांची हत्या

singer neha kakkar

singer neha kakkar

neha kakkar home

neha kakkar home

नेहा कक्करने 2020मध्ये पंजाबी सिंगर (Punjabi Singer) आणि अभिनेता रोहनप्रीत सिंगसोबत (Rohanpreet singh) लग्न केले. लग्नानंतर नेहा आपल्या पतीसोबत नवीन घरामध्ये शिफ्ट झाली. तिच्या या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) होत असतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारी नेहा नेहमी आपल्या घरातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नेहा कक्कर रॉयल लाइफ (Royal Life) जगते. नेहा कक्करचे हे अलिशान घर खूपच सुंदर आहे. तिच्या घरामध्ये क्रीम कलरच्या इटालियन टाइल्सची फ्लोरिंग आहे. तर तिच्या घराच्या भिंती देखील याच कलरच्या आहेत. Also Read - Kiara Advani Birthday Special: सलमान खानच्या सल्ल्याने कियाराने आपले नाव बदलले, चित्रपटात येण्यापूर्वी होती शिक्षिका!

neha kakkar and rohanpreet singh

neha kakkar and rohanpreet singh

neha kakkar new home

neha kakkar new home

नेहा कक्करने आपल्या घरामध्ये क्लासिक पेटिंग लावल्या आहेत. यासोबत घरात आर्टिफिशयल प्लांट देखील ठेवण्यात आले आहेत. मुंबईत असलेल्या नेहा आणि रोहनप्रीतच्या या आलिशान घराला खूप सुंदर बालकनी देखील आहे. नेहाचे घर एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा (5 Star Hotel) कमी नाही. नेहाच्या घराचा डाइनिंग एरिया देखील खूपच सुंदर आहे. तिने आपले सुपर लक्झरीस होम ड्युप्लेक्स स्टाइलमध्ये बनवले आहे. देहराडूनमध्ये देखील नेहाने आपल्या कुटुंबियांसाठी आणखी एक सुंदर बंगला बांधला आहे.