Bollywood Tarzan Accident: बॉलिवूडच्या 'टार्जन'चा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, हेमंत बिर्जे आणि पत्नी जखमी

मंगळवारी रात्री आठ वाजता उर्से टोल प्लाजा येथे ही घटना घडली. उर्से टोलनाक्याजवळ डिव्हाइडरवर हेमंत बिर्जेची गाडी धडकून अपघात झाला.

Updated: January 12, 2022 9:27 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Actor Hemant Birje
Actor Hemant Birje

Bollywood Tarzan Accident: बॉलिवूडमध्ये (Bollywood) ‘टार्जन’ (Tarzan) नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेता हेमंत बिर्जेच्या (Actor Hemant Birje) कारला अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) हेमंत बिर्जेच्या कारला अपघात झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये हेमंत बिर्जे आणि त्याची पत्नी जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या पवना रुग्णालयात (Pawana Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे. हेमंत बिर्जे यांच्या मुलीला अपघातामध्ये काही झाले नाही.

Also Read:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना अभिनेता हेमंत बिर्जेच्या गाडीला अपघात (Hemant Birje Car Accident) झाला. मंगळवारी रात्री आठ वाजता उर्से टोल प्लाजा येथे ही घटना घडली. उर्से टोलनाक्याजवळ डिव्हाइडरवर हेमंत बिर्जेची गाडी धडकली. अपघाताची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हेमंत बिर्जे आणि त्याच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये हेमंत बिर्जेच्या मुलीला काहीच झाले नाही.

हेमंत बिर्जेने बॉलिवूडमधील ‘अॅडवेंचर्स ऑफ टार्जन’ या चित्रपटात टार्जनची भूमिका साकारली. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळेच हेमंत बिर्जेला बॉलिवूडचा टार्जन अशी ओळख मिळाली. हेमंत बिर्जेने ‘अॅडवेंचर्स ऑफ टार्जन’ या चित्रपटासोबत ‘वीराना’, ‘तहखाना’, ‘सिंदूर’ आणि ‘बंदूक’, ‘सौ साल बाद’, ‘आज के शोले’, ‘जंगली टार्जन’, ‘लश्कर’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेमंत बिर्जे हे त्या काळी मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. त्या दिवसांत दिग्दर्शक बब्बर सुभाष चित्रपटासाठी अभिनेत्याच्या शोधात हेमंतपर्यंत पोहोचले. सुभाष यांना चित्रपटासाठी कणखर व्यक्ती हवी होती, म्हणून त्यांनी हेमंतची निवड केली. सुभाष यांनी हेमंतला भूमिकेसाठी विचारले आणि त्याचे प्रशिक्षण सुरू केले. काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हेमंत कॅमेऱ्यासमोर उभा राहिला आणि अशा प्रकारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण शेवटी नशिबाचा खेळ रातोरात लाइमलाइट मिळालेला टार्जन आज एक अनामिक जीवन जगत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 9:24 AM IST

Updated Date: January 12, 2022 9:27 AM IST