Top Recommended Stories

Akshay Kumar New House: बॉलिवूडच्या 'खिलाडी'ने मुंबईत खरेदी केले आलिशान घर, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Akshay Kumar New House: मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने 'सूर्यवंशी' चित्रपट हिट ठरल्यानंतर मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे.

Published: January 24, 2022 8:46 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Akshay Kumar
Akshay Kumar (Photo Courtesy: IANS)

Akshay Kumar New House: बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities) गेल्या काही दिवसांमुळे मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहेत. या यादीमध्ये आता बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचे (Actor Akshay Kumar) नाव सहभागी झाले आहे. अक्षय कुमारने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट (Sooryavanshi Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने ‘सूर्यवंशी’ चित्रपट हिट ठरल्यानंतर मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे.

Also Read:

बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी मुंबईची उच्चभ्रू वस्ती असलेल्या खार आणि वांद्रे (Bandra) परिसरात राहतात. अक्षय कुमारने त्याचे नवीन घर (Akshay Kumar News House) मुंबईच्या खार परिसरात घेतले आहे. अक्षयचे नवीन घर खार पश्चिममधील (Bandra West) जॉय लिजेंड इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आहे. या इमारतीमध्ये फ्लॅटसोबतच अक्षय कुमारला चार गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग स्पेस मिळाली आहे. अक्षय कुमारच्या या नवीन घराची किंमत जवळपास 7.8 कोटी रुपये आहे. अक्षय कुमार सध्या आपल्या कुटुंबासोबत जुहू यथील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. अक्षय कुमारने डिसेंबर 2021 मध्ये अंधेरी पश्चिममध्ये 9 कोटीला आलिशान घर खरेदी केले होते. अक्षय कुमारचे मुंबईत बरेच आलिशान घरं आहेत.

You may like to read

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी 2021 मध्ये आलिशान घरं खरेदी केले आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan), अजय देवगण (Actor Ajay Devgan), ऋतिक रोशन (Actor Hritik Roshan) आणि अभिनेत्री जाह्नवी कपूर (Actress Janhavi Kapoor) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाह्नवी कपूरने मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर खरेदी केले आहे. जाह्नवीच्या या नव्या घराची किंमत 39 कोटी रुपये आहे. अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. त्याच्या या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे. तर अजय देवगनने जुहूमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्या या घराची किंमत 60 कोटी रूपये आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 8:46 AM IST