मुंबई: लोकप्रिय मल्याळम चित्रपट आणि टेलीव्हिजन अभिनेत्री सरन्या शशीचं (Malayalam Actress Saranya Sasi Passes Away) सोमवारी थिरुवनंतपुरममध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाला. सरन्या गेल्या 10 वर्षांपासून ब्रेन ट्यूनरनं (Battling Cancer) पीडित होती. त्याच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. सरन्यानं वयाच्या 35 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला.Also Read - Breaking News Live: काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले हे निर्देश

आजारपणामुळे सरन्या (Saranya Sasi) आणि तिच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यामुळे मित्रं आणि नातेवाईकांनी अक्षरश: वर्गणी जमा करून सरन्यावर उपचार करण्यात आला होता. ब्रेन ट्यूमरवर उपचार घेत असताना सरन्याला कोरोनाची (Corona Infection) लागण झाली होती. कोरोना संक्रमणामुळे सरन्याची प्रकृती खालावली आणि त्यातच तिचं निधन झालं, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
Also Read - BIG BREAKING: बिहारमध्ये प्रवासी बोट पलटी होऊन 22 जण बुडाले, 6 जणांचे मृतदेह बाहेर काढले

सरन्या शशी ही कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी होती. तिनं अनेक चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही सीरियलमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यात ‘छोटा मुंबई’, ‘थलप्पावु, बॉम्बे 12 मार्च’ आणि ‘कूटुकरी’ चित्रपट तर ‘अवकाशिकल’, ‘हरिचंदनम’, ‘मलखमार’ आणि ‘रहस्यम’ सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे. Also Read - Nashik Accident: नाशिकमध्ये ट्रक- रिक्षाची समोरासमोर धडक, अपघातामध्ये 5 जण जागीच ठार

मुख्यमंत्री पिनराई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांनी अभिनेत्री सरन्याच्या अकाली निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर सरन्या शशीला चाहत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिच्या आठवणींना उजाळा मिळवून दिला आहे.

अनेकदा झाली होती सर्जरी-

सरन्या शशीचा गेल्या 10 वर्षांपासून ब्रेन ट्यूमरशी संघर्ष सुरू होता. तिच्यावर अनेकदा सर्जरी देखील करण्यात आल्या होत्या. ट्यूमरवर उपचार सुरू असतानाच सरन्या मे महिन्यात कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडली होती. ती कोरोनातून बरी देखील झाली होती. मात्र, त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिची सोमवारी प्राणज्योत मालवली. सरन्याचा निधन कोरोनामुळे झाल्याची चर्चा सुरू आहे.

उपचारासाठी मित्रांनी गोळा केली वर्गणी-

सरन्या शशी ही कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी होती. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. केरळची ती एक लोकप्रिय टीव्ही कलाकार होती. आजारपणासोबत सरन्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. तिच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते. अखेर मित्र आणि चाहत्यांनी त्याच्या उपचारासाठी फंड जमा केला होता. सरन्याच्या चाहत्यासोबतच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील तिच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. सरन्यानं मोठ्या हिमतीनं आजाराविरुद्ध संघर्ष केला. पण, तिच्यावर मृत्यूनं मात केली, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशमध्ये म्हटलं आहे.