मुंबई: ‘कोई मिल गया’ फेम अभिनेता रजत बेदी (Koi Mil Gaya actor Rajat Bedi) याच्या विरोधात डीएन नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजत बेदीवर (Rajat Bedi) एका व्यक्तीला कारनं ठोकल्याचा आरोप आहे. रजतनं जखमी व्यक्तीला कपूर हॉस्पिटलमध्ये (Kapoor Hospital, Mumbai) दाखल केलं आहे. काल सायंकाळी (September 6, 2021) अंधेरीत रजत बेदीच्या कारला (Rajat Bedi Car Accident) अपघात झाला होता. अपघातात जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रजत बेदी याला अटक होण्याची शक्यता आहे.Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रजत बेदीनं अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला आश्वासन दिलं, की त्याला त्याचे पूर्ण उपचार मिळतील. मात्र, त्यानंतर रजत घरी निघून गेला. डीएन नगर पोलिसांनी सांगितलं की, रजत बेदीविरोधात आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत त्याला अटक झालेली नाही. मात्र, अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. त्याला रक्ताची गरज आहे. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

Also Read - Monsoon Update: राज्यात उद्यापासून पुढचे चार दिवस विजांच्या कडकाटासह मुसळधार पाऊस!

काय म्हणाली पीडीत व्यक्तीची पत्नी?

पीडित व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलं की, काल सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारात ही घटना घडली. तिचा पती कामावरून घरी परत येत होता. तो दारूच्या नशेत होता. तो रस्ता ओलांडत असताना रजत बेदीनं त्याला धडक दिली. माझा पती जमिनीवर पडला. तो गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर रजतनं त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर रजतनं सांगितलं की, व्यक्ती अचानक त्याच्या कारसमोर आला. अपघातग्रस्त व्यक्तीला पूर्ण उपचार मिळतील, असंही रजत म्हणाला. त्यानंतर घरी निघून गेलेला रजत परत आला नाही. माझ्या पतीला काही झालं तर त्यास रजत हाच जबाबदार असेल, त्याला अटक व्हायला हवी, असं पीडितेच्या पत्नीनं म्हटलं आहे.

रजत बेदीचं फिल्मी करियर

रजत बेदीनं एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला सुरूवात केली होती. सन 1998 मध्ये रजत ‘2001’ चित्रपटात पहिल्यांदा झळकला होता. रजतसोबत मुख्य भूमिकेत जॅकी श्रॉफ, डिम्पल कपाडिया आणि तब्बू दिसले होते. रजत बेदी यानं बहुतांश चित्रपटात खलनायक म्हणूनच भूमिका साकारल्या. ‘कोई मिल गया’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’सारख्या हिट चित्रपटात देखील रजत दिसला होता. रजत बेदी सध्या विदेशात बिझनेस करत असल्याचं समजते.