By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Chandra Dance Video: परीला 'चंद्रमुखी'मधील चंद्रा लावणीची भूरळ, अगदी अमृता खानविलकरसाखा केला डान्स!
Chandra Dance Video: चंद्रमुखी चित्रपटातील पोस्टर, गाणी, ट्रेलर आणि टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. अमृता खानविलकरने या चित्रपटात चंद्रा या लावणीवर जबरदस्त डान्स केला आहे. सध्या या डान्सची सर्वांना भूरळ पडली आहे. सोशल मीडियावर (Social Media) या गाण्यावर अनेक जण डान्स करुन व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

Chandra Dance Video: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वीच जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील पोस्टर, गाणी, ट्रेलर आणि टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. अमृता खानविलकरने या चित्रपटात चंद्रा या लावणीवर जबरदस्त डान्स केला आहे. सध्या या डान्सची सर्वांना भूरळ पडली आहे. सोशल मीडियावर (Social Media) या गाण्यावर अनेक जण डान्स करुन व्हिडिओ पोस्ट करत आहेत. हे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. अशामध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (majhi tuzhi reshimgath ) या मालिकेतील लाडक्या परीलाही ‘चंद्रा’ या गाण्याने भुरळ घातली आहे.
Also Read:
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळने (Mysra Vaykul) देखील चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. मायराच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मायराने अगदी अमृता खानविलकर सारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐवढंच नाही तर तिच्यासारखीच नववारी साडी, नाकात नथ घातल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये चिमुकली मायरा खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
Trending Now
मायराचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने ‘चंद्रा’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला मायराच्या चाहत्यांनी आणि अनेक सिनेकलाकारांनी पसंती दिली आहे. एवढंच नाही तर अमृता खानविलकराने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. अमृताने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझी गोंडस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मायरा.’ अमृताच्या कमेंटवर मायराने ‘धन्यवाद…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली आहे. या चित्रपटामध्ये अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत तर अभिनेता आदिनाथ कोठारे दौलतच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २९ एप्रिल म्हणजे आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या