मुंबई : ‘दिल है की मानता नही’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा भट (Actress Pooja Bhatt) 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. महेश भट यांची सर्वात मोठी मुलगी पूजा अभिनयासोबत (Acting) प्रोडक्शन (Production) आणि डायरेक्शनमध्ये (Direction) आपले नशिब आजमावत आहे. पूजा भटने अनेक चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) तिच्याच खऱ्या नावाने काम केले आहे. पूजा भट सध्या चर्चेमध्ये कमी येत असली तरी एक काळ असा होता जेव्हा ती बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी पूजा भट आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात नेहमीच चर्चेत राहायची. Also Read - Sunny Deols Enemies: सनी देओलच्या शत्रूंच्या लिस्टमध्ये आहेत बॉलिवूडचे हे 5 सुपरस्टार, जाणून घ्या कोण आहेत हे अभिनेते!

Mahesh-Pooja Bhatt Kiss

Mahesh-Pooja Bhatt Kiss

पूजा भट आणि तिचे वडील महेश भट (Mahesh Bhatt) यांनी एका मॅगझिनसाठी खूपच बोल्ड फोटोशूट (Bold Photoshoot) केले होते. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना स्मूच (Smooch) करताना दिसले होते. हा फोटो रिलीज झाल्यानंतर खूपच खळबळ उडाली होती. कारण वडील आणि तरुण मुलीने अशाप्रकारे किस (Kiss) करणे हे त्या काळातील लोकांसाठी सभ्यतेच्या सीमा ओलांडण्यासारख्या होत्या. हे फोटोशूट (Photoshoot) त्या काळच्या लोकांसाठी खूपच बोल्ड होते. Also Read - Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांत सिंह राजपूत होता 59 कोटींचा मालक!

controversial kiss

controversial kiss

महेश भट त्यावेळी असे म्हणाले होते की, ‘जर पूजा भट माझी मुलगी नसती तर मी तिच्यासोबत लग्न केले असते.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता. मुलगी-वडीलांच्या नात्यावर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. दरम्यान, पूजा भटची लव्ह लाइफ (Love Life) नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. Also Read - Salman Khan Upcoming Movie List: भाईजानचे हे 8 आगामी चित्रपट करतील 1500 कोटींची कमाई!

जुन्या रिपोर्टनुसार, पूजा भट आणि ‘आशिकी’ चित्रपटाचा अभिनेता राहुल रॉय यांचे अफेअर होते. पण दोघांनी कधी मीडियासमोर (Media) आपलं नातं कबुल केलं नाही. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, पूजा भटचे अफेअर अभिनेता रणवीर शोरीसोबत देखील होते. दोघे एकत्र राहत होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप (Breakup) झाला. पूजाने नंतर मनीष मखीजा यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांचे देखील लग्न फारकाळ टिकले नाही. 11 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला.