मुंबई: म्हणतात ना! संकट आलं की ते चारही बाजुंनी येतं. असं काहीसं बॉलिवूडचा किंग खान (Bollywood King khan) अर्थात शाहरुख खान (shahrukh khan) बाबत घडलं आहे. मुंबईत समुद्रात क्रुझवर रेव्ह पार्टी करताना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (aryan khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांकडून अटक झाली आहे. आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरुखचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आर्यनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी कोर्टानं आणखी पाच दिवस पुढे ढकलली आहे. 20 ऑक्टोबरला आर्यनच्या जामिनीवर सुनावणी होणार आहे. असातच शाहरुख खानची कन्या सुहाना खानबाबत (Suhana khan) बातमी समोर आली आहे.Also Read - Cruise Drugs Party Case: मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु, भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आर्यनची बाजू मांडणार!

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुहाना खानची (Suhana khan) प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळताच सुहाना तातडीनं न्यूयॉर्कवरुन मुंबईच्या दिशेनं रवाना होणार होती. मात्र, त्याचदरम्यान, तिची प्रकृती ढासळल्याचं समजतं. त्यामुळे शाहरुख खान आणि गौरीची चिंता वाढली आहे. या अवस्थेत सुहानाला मुंबईत येण्यास गौरी आणि शाहरुखनं नकार दिला आहे. मात्र, आर्यनबाबत मीडियात येणाऱ्या बातम्या पाहून सुहाना अस्वस्थ झाली आहे. आर्यनवर झालेल्या कारवाईचा सुहानासोबतच धाकट्या अबरामवर (abram khan) देखील परिणाम झाला आहे. Also Read - Sharvari Wagh Hot Photos: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात 'बंटी और बबली 2'मध्ये झळकणार, शर्वरीचे बोल्ड आणि हॉट फोटो व्हायरल!

शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका…

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. त्याचा शाहरुखला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ‘बायजूस’ (byju’s) या एडटेक स्टार्ट-अप कंपनीनं शाहरुखच्या सगळ्या जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुखसोबत केलेला व्यावसायिक करार देखी byju’s नं तोडला आहे. शाहरुखला एका वर्षाला कंपनीकडून 3-4 कोटी रुपये घेत होता. मात्र, आता जाहिराती बंद झाल्यानं शाहरुखचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. Also Read - Bunty Aur Babli 2 Trailer: राणी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या 'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज!