By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Deepikas husband Ranveer Warns: पतीने धोका दिला तर? या प्रश्नावर काय म्हणाली दीपिका पदुकोण, उत्तर ऐकून तुम्हाला बसेल धक्का
Deepika's husband Ranveer warns: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे. रणवीर सिंह हा दीपिकावर जिवापाड प्रेम करतो.

Deepikas husband Ranveer warns: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे. रणवीर सिंह हा दीपिकावर जिवापाड प्रेम करतो. दरम्यान, दीपिका ‘गहराइयां’ (Gehraiyaan) या चित्रपटावरून सध्या चर्चेत आहे. ‘डूबे’ (Doobey) हा ट्रॅक गेल्या आठवड्यात रिलीज झाला. त्यात दीपिका पादुकोण- सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) इंटिमेट झाले आहेत. यातून प्रेक्षकांना रोमान्सचा जबरदस्त तडका दिसणार आहे. अशातच पती रणवीर सिंह याने धोका दिला तर? या प्रश्नाला दीपिकाने दिलेले उत्तर ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
प्रेमात मिळाला अनेकदा धोका..
दीपिका पदुकोणला आयुष्यात अनेकदा धोका मिळाला आहे. प्रेमात तिची फसवणूक झाली आहे. त्यामुळे ती डिप्रेशनचीही शिकार झाली होती. पण, आता तिची पती रणवीर सिंहकडून फसवणूक झाली तर काय? या अनुषंगाने एका इंटरह्यूमध्ये दीपिका म्हणाली, ‘माझ्यासाठी हे डील ब्रेकर असेल, असे सरळ उत्तर देणे आणि हे स्वीकारणे माझ्यासाठी फार कठीण जाईल. नातं तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, दोघे ते नातं विश्वासाने किती किती सक्सेस करतात हे, दोघांवर अवलंबून आहे. ‘ती’ चूक होती किंवा ‘ती’ सवय झाली आहे का? या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष वेधून घेणार्या बर्याच गोष्टी आहेत. लोक अनेकदा चुका करतात. त्यामागे हजारो कारणे असू शकतात.’
दरम्यान, दीपिका रिलेशनशिपमध्ये असताना तिची फसवणूक झाली होती. त्यानंतर तिच्या आयुष्यात रणवीर आला. दोघांनी लग्न केले. आता हे दाम्पत्य खूप आनंदी आयुष्य आहे. परंतु प्रेमात अनेकदा फसवणूक झालेली दीपिका काही काळ डिप्रेस होती. मात्र, आता तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दीपिकाने दिलेले उत्तर ऐकून ती एकेकाळी डिप्रेस असणारी तिच दीपिका आहे का? असा प्रश्न कदाचित आता तिच्या चाहत्यांना देखील पडला असेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या