By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Sonakshi Sinha विरोधात मानहानीचा खटला दाखल, इव्हेंट मॅनेजरबद्दल केला होता अपशब्दांचा वापर!
Defamation Case Filed Against Sonakshi Sinha: काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हाविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी या सर्व अफवा असल्याचे सांगत सोनाक्षीने वाद असलेल्या इव्हेंट मॅनेजरबद्दल अपशब्दांचा वापर केला होता.

Defamation Case Filed Against Sonakshi Sinha: काही दिवसांपूर्वी फसवणूकीच्या प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Actress Sonakshi Sinha) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सोनाक्षी सिन्हाविरोधात मानहानीचा खटला (Defamation Case) दाखल करण्यात आला आहे. मुरादाबाद येथील कोर्टात (Muradabad Court) तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका इव्हेंट मॅनेजरबद्दल (Event Manager) अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. 4 एप्रिलला याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हाविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी या सर्व अफवा असल्याचे सांगत सोनाक्षीने वाद असलेल्या इव्हेंट मॅनेजरबद्दल अपशब्दांचा वापर केला होता. त्यावरूनच सोनाक्षीविरोधात इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्माने (Event Manager Pramod Sharma) तक्रार दाखल केली आहे. त्याने थेट मुरादाबाद कोर्टात धाव घेत तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा हा शिवपूरी येथे राहणारा आहे.
त्याने तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी कार्यक्रमांचं आयोजन करतो. ज्यात मी बॉलिवूड सेलिब्रेटींना बोलवतो. मी सोनाक्षी सिन्हालाही एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. हा कार्यक्रम दिल्ली येथे 30 डिसेंबर 2018 रोजी होणार होता. मात्र अगदी शेवटच्या क्षणी सोनाक्षी आणि तिच्या सहकलाकारानी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. मात्र त्यांनी माझ्याकडून या कार्यक्रमासाठीचे पूर्ण मानधान घेतले होते.’
दरम्यान, याप्रकरणी सोनाक्षी सिन्हा आणि तिचा सहकलाकार अभिषेक सिन्हा यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. ज्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या अफवा असल्याचे तिने सांगितले होते. तसंच तिने या पत्रकार परिषदेवेळी इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्माबाबत बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. यावरुन संतप्त झालेल्या प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या