टीव्ही सीरियल ‘साथ निभाना साथिया’मधील ‘गोपी बहू’ म्हणजेच अभिनेत्रा देवोलीना भट्टाचार्जीची (Devoleena Bhattacharjee) सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ‘गोपी बहू’च्या भूमिकेत दिसणारी देवोलीना घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीजनमध्ये देखील ती दिसली होती. आता तर देवोलीना सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांची रात्रीची झोप उडवत आहे.

देवोलीना (Devoleena Bhattacharjee) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती चाहत्यांना कायम हॉट फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. देवोलीना हिनं नुकताच तिचा एक बेली डान्सचा (Belly Dance Video) व्हिडिओ शेअर केला. त्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे.


देवोलीना (Devoleena Bhattacharjee) व्हिडिओमध्ये बेली डान्स (Belly Dance) करताना दिसत आहे. ‘प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, आता मी या डान्सच्या प्रेमात पडले आहे. मी अजून हा बेली डान्स शिकते आहे,’ असं कॅप्शन तिनं व्हिडिओला दिलं आहे. डान्सचं पूर्ण नॉलेज घेतल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ शेअर करेल, असं देखील देवोलीनानं म्हटलं आहे. देवोलीनाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.