Dharmaveer Teaser: आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच, प्रविण तरडेंनी शेअर केला 'धर्मवीर'चा टीझर
Dharmaveer Teaser :धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: प्रविण तरडे करणार आहेत. तर या चित्रपटाची कथा देखील प्रविण तरडे lत्यांनीच लिहिली आहे.

Dharmaveer Teaser : शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (late Shiv Sena leader Anand Dighe) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा (Anand Dighe Biopic) करण्यात आली आहे. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Actor and director Praveen Tarde) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रविण तरडे यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीचे (Anand Dighes Birth Anniversary) औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Also Read:
‘देऊळ बंद’ (Deul Bandh), ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Patern) आणि बहुचर्चित आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’च्या (Sarsenapati Hambirrao) दिग्दर्शनानंतर आता प्रविण तरडे आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ठाण्याचे (Thane) शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर ‘धर्मवीर’ या आगामी चित्रपटाचे (Dharmaveer Movie) मोशन पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ते स्वत: करणार आहेत. हे मोशन पोस्टर शेअर करत प्रविण तरडे यांनी कॅप्शनमध्ये ‘हिंदुत्व राखणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्ता जपणाऱ्या एका असामान्य नेतृत्वाची चरित्रगाथा…धर्मवीर, मुक्कामपोस्ट ठाणे!’ असे लिहिले आहे.
View this post on Instagram
प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली पण या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार आहे हे अद्याप समजू शकले नाही. पण या चित्रपटाच्या घोषणेमुळे आनंद दिघे यांचे समर्थक आणि शिवसैनिक (Shivsainik) यांना आनंद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडे यांनी मुंबईच्या बीचवरील फोटो शेअर करत या प्रोजेक्टची अस्पष्ट माहिती दिली होती. परंतु आता त्यांनी डायरेक्ट ‘धर्मवीर’चे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.
धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: प्रविण तरडे करणार आहेत. तर या चित्रपटाची कथा देखील प्रविण तरडे lत्यांनीच लिहिली आहे. साहिल मोशन आर्ट्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मंगेश देसाईंनी घेतली आहे. प्रविण तरडे यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यांची मुख्य भूमिका असलेला आणि स्वत: दिग्दर्शित केलेला ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या