By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Dilip Joshi Birthday : 50 रुपये रोजाने काम करणारे 'जेठालाल' आज आहे कोट्यवधीचे मालक, एका एपिसोडसाठी घेतात इतकं मानधन
Dilip joshi Birthday : तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका करण्याआधी जवळपास दीड वर्ष दिलीप जोशी हे बेरोजागार होते. त्यांना मालिकेत चंपकलाल किंवा जेठालाल पैकी कोणतेही एक पात्र निवडायचे होते. त्यानुसार त्यांनी जेठालाल हे पात्र निवडले.

Dilip joshi Birthday : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही मालिका कोणी बघितली नाही असा व्यक्ती शोधणे कठीण आहे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले ‘जेठालाल’ ( Jethalal ) म्हणजेच दिलीप जोशी ( Dilip Joshi ) यांचा आज (26 मे रोजी ) वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना लोटपोट करून सोडणारे दिलीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त ( Dilip Joshi Birthday) त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत….
टेलिव्हिजन विश्वातले नावाजलेले नाव म्हणजे दिलीप जोशी. आपल्या अभिनयाने ते प्रेक्षकांना लोटपोट करून सोडतात. पोरबंदरमधील एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या दिलीप जोशी यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला. त्यांनी 1989 मध्ये रिलीज झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात त्यांनी रामू नावाचे छोटेसे पात्र साकारले होते. त्यानंतर ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. दरम्यान, त्यांनी टीव्ही शोमध्ये देखील काम सुरु ठेवले. तरी देखील त्यांना त्यावेळी पाहिजे तेवढी ओळख मिळाली नव्हती.
कलाकार म्हणून मिळायचे 50 रुपये
दिलीप जोशी यांना अभिनयाची खूपच आवड होती. ही आवड पुढे नेण्याचा निश्चय करत ते नाटकात काम करत राहिले. याठिकाणी जी भूमिका मिळेल ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून देखील त्यांनी काम केले. त्या कामाचे त्यांना फक्त 50 रुपये मिळत होते. दिलीप जोशी यांनी चित्रपटांप्रमाणे अनेक टीव्ही शोमध्ये काम केले हे फार कमी लोकांना हे माहित आहे. मात्र त्यानां खरी ओळख मिळाली ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतूनच.
एका एपिसोडचे 1.5 लाख मानधन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका करण्याआधी जवळपास दीड वर्षे दिलीप जोशी हे बेरोजागार होते. त्यांना मालिकेत चंपकलाल किंवा जेठालाल पैकी कोणतेही एक पात्र निवडायचे होते. त्यानुसार त्यांनी जेठालाल हे पात्र निवडले. 2008 मध्ये त्यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम मिळालेआणि त्यांचा यशाचा मार्ग मोकळा झाला. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रिपोर्टनुसार, जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी हे एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मानधन घेतात. ते या मालिकेतील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या