Top Recommended Stories

Disha Patani नं परिधान केला लाख रुपयांचा मिनी ड्रेस, हातातील Matchbox आकारातील Bag पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

Disha Patani Matchbox Bag Is viral: 28 एप्रिलला रात्री ‘हीरोपंती 2’चे (Heropanti 2) स्पेशल स्क्रीनिंग झाले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलब्सनी हजेरी लावली. अभिनेत्री दिशा पाटणी हिचा महागडा ड्रेस आणि मॅचबॉक्सच्या आकाराच्या बॅगने (Matchbox Bag) सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Published: April 30, 2022 2:29 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Disha Patani नं परिधान केला लाख रुपयांचा मिनी ड्रेस, हातातील Matchbox आकारातील Bag पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

Disha Patani Matchbox Bag Is viral: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) हिने टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चित्रपट ‘हीरोपंती 2’ च्या (Heropanti 2) स्पेशल स्क्रीनिंगला सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दिशा पाटणी ही बॉलिवूडमधील चर्चित अत्रिनेत्रींपैकी एक आहे. दिशा सध्या सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोमुळे ट्रेंडमध्ये आहे. अशात दिशाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ‘हीरोपंती 2’ च्या (Heropanti 2) स्पेशल स्क्रीनिंगमधील ही दिशाचा व्हिडिओ आहे. लव्हेंडर कलरमधील मिनी ड्रेसमध्ये दिशा फारच ग्लॅमरस दिसते आहे. दिशाच्या ड्रेसची किंमत जवळपास लाख रुपये आहे. विशेष म्हणजे दिशाच्या हातात एक बॅग दिसते आहे. या बॅगचा आकार एका मासिस (Matchbox) एवढा आहे. दिशाच्या या बॅगवरच सगळ्याच्या नजरा खिळून आहेत.

Also Read:

व्हिडिओमध्ये दिशा पाटणी लव्हेंडर कलरमधील आउटफिटमध्ये दिसते आहे. परंतु दिशाच्या हातातील माचिसच्या आकाराच्या हॅंडबॅगचे सगळ्यांना कुतूहल आहे. दिशा पाटणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिशाचे फॅन्स तिचं भरभरुन कौतुक करत आहे. दिशा पेक्षा तिच्या छोट्या हॅंडबॅगचीच चर्चा होत आहे.

You may like to read

एक यूजरने म्हटले आहे, की प्रश्न एका गोष्टचा आहे तो म्हणजे इतक्या छोट्या हॅंडबॅगमध्ये दिशा नेमकं काय ठेवत असावी. दिशाची बॅग पाहून इतर चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.


त्याचबरोबर दिशाने परिधान केलेल्या लव्हेंडर कलरच्या ड्रेसची देखील चर्चा होते आहे. स्पेगेटी-स्ट्रॅप्ड ड्रेसचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास त्यावर क्रिस्टल प्रकारातील भरतकाम करून फुले बनवण्यात आली आहे. ही फुले सगळ्यांचा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. दिशाच्या मिनी ड्रेसला मागील बाजुस एक हिडन जिप क्लोजर देखील आहे. दिशाचा मिनी ड्रेस आणि तिच्या हँडबॅगची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तिचा ड्रेस लाख रुपयांचा आहे तर तिच्या हातातील बॅकची किंमत 46000 रुपये एवढी आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 2:29 PM IST