Top Recommended Stories

Disha Tiger breakup : दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ यांचीही आली रिअ‍ॅक्शन

Disha Tiger breakup : बॉलिवूडमधील हॉट कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. यावर आता जॅकी श्रॉफ यांनीही भाष्य केले आहे.

Updated: July 28, 2022 7:58 AM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप?  जॅकी श्रॉफ यांचीही आली रिअ‍ॅक्शन
दिशा पटानी-टायगर श्रॉफचं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ यांचीही आली रिअ‍ॅक्शन

Disha Tiger breakup : टायगर श्रॉफ (Tiger Shroff)आणि दिशा पटानी (Disha Patani)यांचे सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप (Disha Tiger breakup)झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे चर्चा केलेली नाही. त्यांनी त्यांचे नाते पब्लिकली स्वीकारले नाही, मात्र त्यांनी ते नाकारले देखील नव्हते. दोघांचे एकत्र आउटिंग पाहून चाहते दोघेही एकमेकांना डेट (Disha tiger dating) करत असल्याचा अंदाज बांधत होते. दोघांचे मालदीवमधील व्हेकेशनही सांगत होते की, दोघांमधील जवळीक खूप वाढत आहे. पण आता ताज्या बातम्यांनुसार, दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपचे वृत्त समोर येत आहे.

दोघांच्या कॉमन फ्रेंडने दिला दुजोरा (Disha Tiger friend)

दिशा पटानी आणि टायगर हे गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र या वर्षीच्या सुरुवातीलाच त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. याविषयी दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने माहिती दिली आहे. त्याने त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, टायगर आणि दिशा यांचे ब्रेकअप अनेक दिवसांपूर्वीच झाले आहे.

You may like to read

काय म्हणाले टायगर श्रॉफ?

बॉम्बे टाईम्सशी संवाद साधताना, टायगर श्रॉफच्या (Jockey shroff) वडिलांनी मुलाच्या ब्रेकअपच्या ब्रेकअपविषयी सांगितले की,- ते (दिशा-टायगर) नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. तसेच जो निर्णय असेल तो त्यांचा खासजी निर्णय आहे. याविषयी त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. तसेच त्यांना सोबत राहायचे आहे की नाही हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. ही त्यांची लव्ह स्टोरी आहे. आमचे दिशासोबत चांगले नाते आहे. तसेच ते दोघं जेव्हा भेटतात आणि बोलतात तेव्हा खुश दिसतात.

दिशा पटानी-टायगर श्रॉफचे आगामी प्रोजेक्ट्स

वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर, बरेलीमध्ये जन्मलेली अभिनेत्री पुढे ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्ये दिसणार आहे, जो 2014 च्या हिट ‘एक व्हिलन’ चा सिक्वेल आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिशा सिद्धार्थ मल्होत्राचा अ‍ॅक्शन फिल्म ‘योद्धा’ आणि प्रभासची साय-फाय फिल्म ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘केटीना’ मध्येही दिसणार आहे.

दुसरीकडे टायगर श्रॉफने अलीकडेच ‘स्क्रू ढीला’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली. करण जोहर प्रस्तुत या अ‍ॅक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत. पुढे क्रिती सेननसोबत त्याचा ‘गणपत : भाग 1’ आहे. विकास बहल दिग्दर्शित या प्रोजेक्टचे शूटिंग सुरू आहे आणि 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याशिवाय त्याच्या जवळ अक्षय कुमारसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ देखील आहे, जो 2023 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे. टायगरकडे ‘रॅम्बो’ हा अ‍ॅक्शन चित्रपटही आहे जो ‘वॉर’चा दिग्दर्शक सिद्धार्थ दिग्दर्शित करणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.