नवी दिल्ली : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमला (Actress Yami Gautam) ईडीने समन्स बजावल्यानंतर आता अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) देखील ईडीच्या रडारवर आला आहे. ईडीने काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (Congress Leader Ahmed Patel) यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी, डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांच्याविरोधात बँकेची फसवणूक (Bank Fraud) आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीने (ED) डिनो मोरियासह या सर्वांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत (PMLA Act) ईडीने या चारही जणांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे.Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

Also Read - Bigg Boss Season 15: बिग बॉस सीझन 15साठी सलमान खानने घेतले ऐवढं मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क!

ईडीने याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, ‘हे संपूर्ण प्रकरण 14,500 कोटींचे आहे. या चारही जणांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.’ ईडीने या कारवाईमध्ये एकूण 8.79 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये संजय खान याची 3 कोटींची संपत्ती आहे. डिनो मोरिया याची 1.4 कोटींची संपत्ती, डीजे अकील याची 1.98 कोटींची संपत्ती आणि दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे जावाई इरफान अहमद सिद्दीकी याची 2.41 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

हे संपूर्ण प्रकरण मनी लॉन्ड्रिंगचे (money laundering case) असल्याचे सांगितले जात आहे. गुजराती स्टर्लिंग बायोटेक ( Gujrathi sterling biotech) फार्मास्यूटिकल कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. ईडीने ट्वीट (ED Tweet) करत यासंबंधी माहिती दिली आहे. आतापर्यंत ईडीने 14521.80 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डिनो मोरिया, संजय खान, डीजे अकील आणि इरफान अहमद सिद्दीकी यांना स्टर्लिंग बायोटेक ग्रुपचे मालक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी पैसे दिले होते. 2011 आणि 2012 दरम्यान संदेसरा भावांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डिनो मोरिया आणि डीजे अकिल सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले होते.