Fatima Sana Shaikh Birthday : ब्राम्हण कुटुंबात झाला 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखचा जन्म, बालकलाकार म्हणून केलं होतं पदार्पण

'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेख आज 11 जानेवारी रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2016 साली आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटात फातिमाने पैलवान गिता फोगाटची भूमिका साकारली होती.

Published: January 11, 2022 6:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Fatima Sana Shaikh reveals that she is suffering from epilepsy mirgi ke daure she was scared for not getting work
Fatima Sana Shaikh

Actress Fatima Sana Shaikh Birthday: ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख आज 11 जानेवारी रोजी तिचा 28 वा वाढदिवस (28th birthday) साजरा करत आहे. 2016 साली आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात फातिमाने पैलवान गिता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून फातिमाला (Fatima Sana Shaikh) बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले. आजही तिला ‘दंगर्ल गर्ल’ नावाने ओळखले जाते.

Also Read:

ब्राम्हण कुटूंबात झाला जन्म

फातिमाचा जन्म हैदराबाद (तेलंगणा) येथे झाला. ती मुंबईत लहानाची मोठी झाली. फातिमाचे वडील विपिन शर्मा (Father Vipin Sharma) हे जम्मूतील ब्राह्मण कुटुंबातील आहेत तर तिची आई तबस्सुम (Mother Tabassum) श्रीनगरमधील मुस्लिम कुटुंबातील आहे. या अभिनेत्रीचे नाव फातिमा सना शेख असे ठेवण्यात आले कारण तिच्या घरात इस्लाम धर्म मानला जातो. फातिमाच्या जन्मानंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले, त्यानंतर ती कधीच हैदराबादला गेली नाही असे सांगितले जाते.

बालकलाकार म्हणून केले चित्रपटात काम

फातिमा सना शेखने आपल्या करिअरची सुरुवात लहान वयातच केली होती हे कदाचित तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल. फातिमाने ‘चाची 420’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात (Worked in films as a child artist) केली होती. तिने दक्षिण भारतातील एक उत्कृष्ट अभिनेते कमल हासन यांच्यासोबत तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी हा चित्रपट खूप आवडला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की त्यावेळी फातिमा 6 वर्षांची होती. वन टू का फोर आणि बडे दिलवाला या चित्रपटात देखील ती बालकलाकार म्हणून दिसली होती.

फातिमाने टीव्हीमध्येही केले काम

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी फातिमाने टीव्हीमध्येही काम (Fatima also worked in TV) केले आहे. तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘लेडीज स्पेशल’ आणि ‘आगले जनम मोहे बिटिया ही किजो’मध्ये काम केले आहे. याशिवाय फातिमाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र करिअरच्या दृष्टिकोनातून फातिमाला विशेष यश मिळालेले नाही.

एक उत्तम डान्सर आणि फोटोग्राफर

अभिनेत्री असण्यासोबतच फातिमा एक उत्तम डान्सर आणि फोटोग्राफरही (A Good Dancer and Photographer) आहे. ती एका स्टुडिओत फोटोग्राफर म्हणून काम करत होती. छायाचित्रकार म्हणूनही तिने जाहिरातींमध्ये काम केले आहे. तुम्ही फातिमाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर असे अनेक फोटो आहेत जे तिच्या टॅलेंटला उजाळा देतात.

आमिर खानसोबत जोडले गेले नाव

फातिमा शेखने एकदा स्विमसूट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर अनेकांनी तिला धमक्या दिल्या होत्या. यासाठी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगदरम्यान फातिमा सना शेखचे नाव अभिनेता आमिर खानसोबत देखील जोडले गेले होते. परंतु फातिमाने नंतर ही अफवा असल्याचे म्हणत चर्चांना पूर्ण विराम दिला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 6:00 AM IST