Top Recommended Stories

Feroz Khan Death Anniversary : फिरोज खान यांच्या 'या' टीकेमुळे पाकिस्तानने घातली होती त्यांच्यावर प्रवेश बंदी, जाणून घ्या रंजक गोष्टी

Feroz Khan Death Anniversary : फिरोज खान (Feroz Khan ) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna ) यांची मैत्री बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. या दोघे जोडीचा चित्रपट (Bollywood Movie ) पडद्यावर आला म्हणजे चित्रपट हीट झाला असेच समजावे. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुर्बानी' चित्रपटामुळे (Qurbani Movie ) विनोद खन्ना यशाच्या शिखरावर पोहोचले होते. 

Published: April 27, 2022 2:30 PM IST

By Vikas Chavhan | Edited by Vikas Chavhan

Feroz Khan Death Anniversary : फिरोज खान यांच्या 'या' टीकेमुळे पाकिस्तानने घातली होती त्यांच्यावर प्रवेश बंदी, जाणून घ्या रंजक गोष्टी

Feroz Khan Death Anniversary : बॉलिवूडमध्ये (Bollywood News ) 60 च्या दशकात प्रवेश केलेले अभिनेते फिरोज खान (Feroz Khan ) हे आपल्या स्टायलिश अंदाजमुळे प्रसिद्ध होते. फिरोज खान (Feroz Khan Love Story ) यांनी आपल्या करिअरमध्ये रोमॅंटिक हीरोपासून ते खलनायकपर्यंत भूमिका साकारली आहे. 25 सप्टेंबर 1939 रोजी कर्नाटकातील (Karnataka ) मैसूर येथे जन्मलेल्या फिरोज खान (Feroz Khan Birth place) यांचे वडील मूळचे अफगणिस्तानचे असून आई इराण येथील आहे. फिरोज खान यांना आपल्या बेधडक अंदाजमुळे देखील ओळखले जाते. आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी फिरोज खान यांची पुण्यतिथि (Feroz Khan Death Anniversary )आहे. पुण्यतिथिनिमित्त जाणून घेवूया त्यांच्या विषयी रंजक गोष्टी.  फिरोज खान यांनी 1960 मध्ये ‘दीदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याच दरम्यान, त्याची सुंदरीशी भेट झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात होत पाच वर्षांनी दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली एक मुलगी लैला खान तर मुलगा फरदिन खान. विवाहित तसेच दोन मुलांचे वडील असताना देखील फिरोज खान एका एअर होस्टेसच्या प्रमात पडले होते.

एअर होस्टेससाठी पत्नीला दिला घटस्फोट

फिरोज खान एका एअर होस्टेसच्या प्रेमात पडल्यानंतर पत्नी आणि मुलांना सोडून बंगलोर येथे प्रेमिकेसह लिव-इनमध्ये राहत होते. बर्‍याच दिवस चाललेलं हे प्रेम कालांतराने संपत दोघे वेगळे झाले. त्यानंतर पत्नीने देखील फिरोज खान यांना घाटस्फोट दिला. फिरोज खान यांच्याबद्दल असेही म्हटले जाते की, ते मुमताजवर देखील प्रेम करत होते आणि लग्न देखील करणार होते. मात्र नशिबाची साथ मिळाली नाही. शेवटी त्यांच्या मुलगा फरदिन याने मुमाताजची मुलगी नताशा सोबत लग्न केले.

You may like to read

पाकिस्तानात घुसून केली टीका

‘ताजमहाल’ चित्रपटच्या प्र्मोशांनासाठी जेव्हा फिरोज खान पाकिस्तानला गेले होते. तेव्हा त्यांनी बेधडकपणे पाकिस्तानवर टीका केली होती. यावेळी त्यांनी लाहोरमध्ये भारताची प्रशंसा करत, भारत एक धर्म निरपेक्ष देश आहे. भारतीय मुसलमान झापट्याने प्रगति करत आहे. याचेवेळी त्यांनी पाकिस्तावर टीका करत, इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. मात्रा इथे परिस्थिती गंभीर आहे. पाकिस्तानात लोक एकमेकांचे शत्रू आहे. यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ याने फिरोज खान यांना पाकिस्तानात येण्यास बंदी घातली होती.

विनोद खन्ना सोबत होती जिवलग मैत्री

फिरोज खान आणि विनोद खन्ना यांची मैत्री बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. या दोघे जोडीचा चित्रपट पडद्यावर आला म्हणजे चित्रपट हीट झाला असेच समजावे. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटामुळे विनोद खन्ना यशाच्या शिखरावर पोहोचले होते. या चित्रपटात फिरोज खान हे चित्रपत निर्माते, दिग्दर्शक आणि अॅक्टरच्या भूमिकेत होते. या दरम्यान, दोघांची मैत्री घट्ट झाली होती. दोघांच्या निधनाची तारिख सारखी आहे. मात्र फिरोज खाना यांनी 2009 साली तर विनोद खन्ना यांनी 2017 मध्ये जगचा निरोप घेतला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.