मुंबई : खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भावुक करणारी एक प्रेम कथा घेऊन येत आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री कृती सेननची बहीण नुपूर सेनन (Nupur Senon) यांच्या ‘फिलहाल 2’ (Filhall 2) म्यूझीक व्हिडिओचा टीझर रिलीज झाला आहे. या आधी या दोघांची जोडी ‘फिलहाल’मध्ये (Filhall) लोकांनी बरीच आवडली होती आणि त्याला मिळालेली प्रेक्षकांची पसंती पाहूनच याचा दुसरा भाग बनवण्यात आला आहे. निर्मात्यांनी ‘फिलहाल 2’चे (Filhall 2) टीझरही रिलीज केले आहे. हे टीझर फक्त 51 सेकंदांचे आहे (Filhaal 2 Teaser Out) मात्र याच 51 सेकंदांनी काही तासातच सोशल मीडियावर धुकाकूळ घातला आहे. (Filhaal 2 Teaser Out See Akshay Kumar-Nupur Sanon Love Story)Also Read - Shilpa Shetty Birthday : वादग्रस्त ठरलं होतं अक्षय कुमार सोबतच नातं, असं आहे शिल्पा शेट्टीचं करिअर

अक्षय कुमारने ‘फिलहाल 2’(Filhall 2) गाण्याचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे टीझर पोस्ट करताना अक्षयने त्याला “‘फिलहाल’ प्रेम करण्याची वेळ जवळ येत आहे” असे कॅप्शन दिले आहे. ‘फिलहाल 2’ हे गाणं 6 जुलै रोजी रिलीज होणार आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या गाण्याची प्रचंड उत्सुकता आहे. या आधी अक्षयने या गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. त्यामध्ये अक्षय दुचाकीवर बसलेला दिसला होता तर नुपूर सेनन त्याला मागून मिठी मारताना दिसली होता. एकमेकांना पूरक असे दोघेही खूप सुंदर दिसत होते.(Filhaal 2 Teaser Out See Akshay Kumar-Nupur Sanon Love Story) Also Read - Shahrukh Khan Corona Positive: बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अक्षय, कार्तिकनंतर शाहरुख खानलाही कोरोनाची लागण

Also Read - गुलाबी रंगाच्या साडीत खुललं Manushi Chhillar चं सौंदर्य, फोटो पाहून चाहते पडले प्रेमात!

या गाण्याचे टीझर भावुक करणारे असून टीझरमध्ये गाण्याची केवळ एकच ओळ ऐकू येत आहे. यापूर्वी या गाण्याचे पोस्टर शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये ‘आणखी दुख: सुरू आहे…’असे कॅप्शन लिहिले होते. त्यापुढे लिहिताना त्याने “जर ‘फिलहाल’ने आपल्या हृदयाला स्पर्श केला असेल तर फिलहाल-2 चं प्रेम आपल्या आत्म्यास स्पर्श करेल” असे म्हटले होते. (Filhaal 2 Teaser Out See Akshay Kumar-Nupur Sanon Love Story)