Top Recommended Stories

कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती, अभिनेते Kiran Mane नी शेअर केली फेसबूक पोस्ट

Actor Kiran Mane Removed from serial Mulgi Jhali Ho : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या नावाची दोन दिवसांपासून

Published: January 16, 2022 5:48 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती, अभिनेते Kiran Mane नी शेअर केली फेसबूक पोस्ट
Actor Kiran Mane Removed from serial Mulgi Jhali Ho

Actor Kiran Mane Removed from serial Mulgi Jhali Ho : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या नावाची दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. माने यांना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने वातावरण खूपच तापलं आहे. ते या मालिकेत विलास पाटीलची (Vilas Patil) भूमिका करत होते. आपण राजकीय भूमिका (Political opinion) व्यक्त केल्यामुळे आपल्याला मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले अशी प्रतिक्रिया किरण माने यांनी दिली होती. त्यानंतर आता प्रोडक्शन हाऊसकडून मानेंना मालिकेतून काढून (Removed from serial) टाकण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

Also Read:

किरण माने (Kiran Mane) यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांच्या विरोधात काही आरोप केले आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीने एक निवेदन जारी करत माने यांना मालिकेतून काढून टाकण्याबाबतची भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी किरण माने यांनी वाहिनीवर लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. तसेच माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याची काही कारणे देखील या निवेदनातून सांगितली आहेत.

You may like to read

वाहिनीने जारी केलेल्या निवेदनानुसार “माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सहकलाकारांसोबत विशेषतः शोच्या महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक, सहकलाकार आणि इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या, असे देखील वाहिनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वाहिनीच्या या निवेदनावर अभिनेते किरण माने यांची देखील प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे.

माने यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये म्हटले की “आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू….. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !”

“पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर विस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगण घालणारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा !
मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!” अशी प्रतिक्रिया माने यांनी फेसबूक पोस्टमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे वाहिनीने आपली भूमिका मांडण्याआधीच किरण माने यांनी ही पोस्ट शेअर केली होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 16, 2022 5:48 PM IST