Top Recommended Stories

Gangubai Kathiawadi: आलिया भट्ट गेली होती मुंबईच्या रेड लाईट एरियात! तिथे सेक्स वर्कर्स...

Gangubai Kathiawadi: संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' (gangubai kathiawadi) येत्या 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Updated: February 4, 2022 3:03 PM IST

By पी.संदीप | Edited by पी.संदीप

Gangubai Kathiawadi Movie
Gangubai Kathiawadi Movie

Gangubai Kathiawadi: संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) येत्या 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील कमाठीपुरामधील एक वेश्यालयाची प्रमुख गंगूबाई कोठेवालीचे (Gangubai Kothewali) जीवन आणि लेखक हुसैन जैदी (Author Hussain Zaidi) याचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ मधील (Mafia Queens of Mumbai) एका प्रकरणावर चित्रपट आधारित आहे.

Also Read:

मीडिया रिपोर्ट्स, आपल्या भूमिकेत आणखी रंग भरण्यासाठी आलिया भट्ट मुंबईतील रेड लाइट एरियात गेली होती. तिथे तिने सेक्स वर्कर्सचं जीवन नेमके कसे असते, हे जाणून घेतले. काही सेक्स वर्कर्सनी आलियाला मदत केल्याचेही समजते.

You may like to read

असे सांगितले जाते की, गंगूबाई कोठेवालीचा कमाठीपुऱ्यात चांगलाच दबदबा होता. तिच्या वेश्यालयात कधीच अंधार होत नव्हता. ‘आदराने जगायचे आणि कोणाला घाबरायचे नाही.’, असे गंगूबाई नेहमी म्हणायची. गंगूबाई 16 वर्षाची असतानाच मुंबईत वेश्या व्यवसायाच्या दलदलीत फसली होती. मग तिने मोठ्या हिम्मतीने एका डॉनच्या घरी जाऊन त्याला आपला भाऊ बनवले होते. ती त्याला राखी बांधत होती. इतकेच नाही तर ती सेक्स वर्कर्सच्या हक्कासाठी लढली. देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचली.

गंगूबाईचं खरं नाव गंगा हरजीवन दास काठियावाडी असे होते. ती गुजरातमध्ये राहात होती. गंगेचे मन अभ्यासात कधीच लागत नव्हते. मुंबईच्या चमकधमलने तिचे लक्ष वेधले होते. आशा पारेख आणि हेमामालिनी सारखी प्रसिद्ध अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु, तिच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. 3 तासांच्या चित्रपटात गंगूबाईंचे आयुष्य कव्हर करणे शक्य नाही. तिची जीवनकथा फार मोठी आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 2:55 PM IST

Updated Date: February 4, 2022 3:03 PM IST