Top Recommended Stories

बॉक्स ऑफिसवर 'Gangubai Kathiawadi'चे वर्चस्व, आतापर्यंत जमवला 39.82 कोटींचा गल्ला!

Gangubai Kathiawadi Box Office Collection : या चित्रपटाने शुक्रवारी 10.50 कोटी, शनिवारी 13.32 कोटी आणि रविवारी 16 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 39.82 कोटींचा व्यवसाय केला आहे.

Updated: February 28, 2022 2:08 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Gangubai Kathiawadi Box Office Collection
Gangubai Kathiawadi Box Office Collection

Gangubai Kathiawadi Box Office Collection : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टचा (Actress Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाला (Gangubai Kathiawadi Movie) प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट बॉक्सऑफिसवर (Box Office) वर्चस्व करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी 10.50 कोटी, शनिवारी 13.32 कोटी आणि रविवारी 16 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 39.82 कोटींचा व्यवसाय केला आहे. गंगूबाई काठियावाडीची कमाई पाहता निर्मात्यांनी ते ओटीटीवर प्रदर्शित करणे पुढे ढकलले आहे.

Also Read:

‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’या (The Mafia Queen Of Mumbai) पुस्तकावर आधारित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. आलिया भट्टने या चित्रपटात गंगूबाईची मुख्य भूमिका साकारली असून सुपरस्टार अजय देवगणने (Ajay Devgn) करीम लालाची भूमिका साकारली आहे. आलिया भट्ट हा चित्रपट आपल्या खांद्यावर घेऊन गंगा ते गंगू नंतर गंगूबाई आणि नंतर संपूर्ण कामाठीपुरावर राज्य करणारी माफिया होते. आलियाने प्रत्येक क्षणात तिची व्यक्तिरेखा समोर आणली आहे. तर दुसरीकडे, अजय देवगण जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तो त्याच्याच स्टाईलमध्ये मग्न असतो. त्याला पाहून तुम्हाला त्याच्या ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’मधील सुलतान मिर्झा या व्यक्तिरेखेची आठवण होते. तो मसिहासारख्याच स्टाईलमध्ये येतो.

You may like to read

त्याचबरोबर, सीमा पाहवा हिने या चित्रपटात कोठा चालवणाऱ्या मावशीची भूमिका साकारली असून ती जोपर्यंत असते तिच्या पात्राची भुरळ पाडताना दिसते. याशिवाय देहाच्या या भुकेत खऱ्या प्रेमाचा शोध घेणाऱ्या शंतनू माहेश्वरीच्या शांत पात्राच्या प्रेमात तुम्ही पडाल. या चित्रपटात आलिया आणि अजय देवगण व्यतिरिक्त हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राज यांसारखे दिग्गज कलाकार दिसले आहेत. संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खर्च केले आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतरचा हा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट आहे जो पडद्यावर आला आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटातून चांगलीच कमाई होत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाचे खूप कौतुक होत असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये डब केलेल्या तेलुगू भाषेमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, करीम लाला गंगूबाईला आपली बहीण मानतो आणि कोणीही तिच्या पाठीशी उभे नसताना तिला साथ देतो. लेखक एस हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गंगूबाई गुजरातमधील (Gujarat) काठियावाड (Kathiawad) येथील रहिवासी होत्या त्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी असे म्हटले जात होते आणि तिला तिच्या पतीने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटात अजय देवगणने (Ajay Devgn) करीम लालाची भूमिका साकारली आहे. आलिया भट आणि अजय देवगणसह या चित्रपटात विजय राज, सीमा पाहवा आणि शंतनू महेश्वरी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 1:58 PM IST

Updated Date: February 28, 2022 2:08 PM IST