'हमारी इज्जत रोज बिकती है, फिरभी खतम नही होती!', Gangubai Kathiawadiचा जबरदस्त ट्रेलर रिलीज!
Gangubai Kathiawadi Trailer: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भटचा (Actress Alia Bhatt) बहुचर्चित आणि बहुप्रत

Gangubai Kathiawadi Trailer: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भटचा (Actress Alia Bhatt) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट गंगुबाई काठियावाडीचा जबरदस्त ट्रेलर (Gangubai Kathiawadi Trailer) रिलीज झाला आहे. आलिया भटच्या या चित्रपटाची तिची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया भटने साकारलेली गंगुबाई काठियावाडीची दमदार भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Also Read:
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgan) दमदार एंट्रीही पाहायला मिळत आहे. हे. या चित्रपटात अजय गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे. यामध्ये आलिया भट अतिशय दबंग अवतारात दिसत आहे आणि हा तिचा आजपर्यंतचा सर्वात धमाकेदार अवतार असणार आहे ज्याला चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून असे वाटते की हा चित्रपट हिट ठरणार आहे.
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर, करीम लाला गंगूबाईला आपली बहीण मानतो आणि कोणीही तिच्या पाठीशी उभे नसताना तिला साथ देतो. लेखक एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गंगूबाई गुजरातमधील (Gujarat) काठियावाड (Kathiawad) येथील रहिवासी होत्या त्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी असे म्हटले जात होते आणि तिला तिच्या पतीने 500 रुपयांना विकले होते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या