Top Recommended Stories

Gehraiyaan Song Doobey Release: दीपिका पादुकोण-सिद्धांत चतुर्वेदी झाले इंटिमेट, रोमान्सचा जबरदस्त तडका

अॅमेझॉन ओरिजिनलच्या आगामी 'गहराइयां' या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रोमान्सवर चित्रित झालेला ‘डूबे' हा ट्रॅक सोमवारी रिलीज झाला.

Published: January 24, 2022 8:29 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Gehraiyaan Song Doobey Release: दीपिका पादुकोण-सिद्धांत चतुर्वेदी झाले इंटिमेट, रोमान्सचा जबरदस्त तडका
Gehraiyaan Song Doobey Release Deepika Padukone-Siddhant Chaturvedi Became Intimate, Great Romance

Gehraiyaan Song Doobey Release: अॅमेझॉन ओरिजिनलच्या आगामी ‘गहराइयां’ या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या रोमान्सवर चित्रित झालेला ‘डूबे’(Doobey) हा ट्रॅक सोमवारी रिलीज झाला. कौसर मुनीर लिखित आणि लोथिका झा यांनी गायलेल्या ‘डूबे गाण्यांचं (Doobey song out now) संगीत ओएएफएफ आणि सावेरा यांनी दिले आहे आणि अंकुर तिवारी यांनी डिझाइन केले आहे.

Also Read:

अंकुरने सांगितले की ‘गहराइयां’चे संगीत (Gehraiyaan Music) कथेसाठी योग्य असावे आणि प्रेक्षकांनी या पात्रांच्या दुनियेत रमून जावे हे पहिल्यापासूनच माझ्या डोक्यात होते. “कबीर, सावेरा आणि आमचे गीतकार कौसर या सर्वांनी गाण्यात तरुणपणाचा फील आणण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे आणि लोथिकाच्या स्वरांनी गाण्यात उत्तम ताजेपणा आणि तीव्रता आणली आहे.”

You may like to read

अंकुरने डिझाइन केलेले हे गाणं कबीर कठपलिया उर्फ ​​ओएएफएफ आणि सावेरा यांनी संगीतबद्ध केले आहे. कौसर मुनीर यांनी हे गाणं लिहिले असून लोथिका झा यांनी ते गायले आहे. या गाण्यात दीपिका आणि सिद्धांत यांच्यातील इंटमेट दृष्य दाखवण्यात आले आहे. दोघांच्या केमिस्ट्रीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या जॉस्का फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने Viacom18 Studios आणि Dharma Productions द्वारे निर्मित हा चित्रपट (Gehraiyaan On Prime) 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 8:29 PM IST