Happy Birthday Preity Zinta: साबणाच्या जाहिरातीत करत होती काम, आता IPLमध्ये एका संघाची मालकीण आहे प्रीती झिंटा!
Happy Birthday Preity Zinta : प्रीती झिंटाचा 31 जानेवारी म्हणजे आज वाढदिवस आहे. प्रीती झिंटा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

Happy Birthday Preity Zinta : बॉलिवूडच्या (Bollywood) सुंदर आणि दिग्गज अभिनेत्रींमध्ये प्रीती झिंटाचे (Actress Preity Zinta) नाव घेतले जाते. प्रीती झिंटाचा 31 जानेवारी म्हणजे आज वाढदिवस (Happy Birthday Preity Zinta) आहे. प्रीती झिंटा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. प्रिती झिंटाचा जन्म 31 जानेवारी 1975ला शिमला (Shimla) येथे झाला. तिचे वडील दुर्गानंद झिंटा हे आर्मी ऑफिसर होते. पण कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी प्रीती झिंटा अवघ्या 13 वर्षांची होती. अशा स्थितीत अचानक संपूर्ण घराची जबाबदारी प्रीतीच्या खांद्यावर आली. प्रीतीला दीपंकर आणि मनीष असे दोन भाऊही आहेत. दीपंकर प्रीतीपेक्षा वयाने मोठा आहे. तो भारतीय सैन्यात अधिकारी आहे, तर मनीष तिच्यापेक्षा लहान असून तो कॅलिफोर्नियामध्ये राहतो. आज प्रीतीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी….
Also Read:
जाहिरातींमध्ये केले काम –
प्रिती झिंटाने तिचे संपूर्ण शिक्षण शिमला येथे पूर्ण केले. त्यानंतर ती मुंबईत राहायला आली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रीतीने मॉडेलिंगमध्ये (Modeling) नशीब आजमावले. त्याचवेळी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिची ओळख एका दिग्दर्शकाशी झाली. त्याने तिला जाहिरात एजन्सीकडून जाहिरातीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. यानंतर ती ‘लिरिल सोप’ आणि ‘पर्क चॉकलेट’सह अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये (work in advertising) दिसली.
मणिरत्नम यांनी प्रीतीला दिला ब्रेक –
शेखर कपूर (Shekhar Kapoor) दिग्दर्शित ‘तारा रमपमपम’ या चित्रपटातून प्रीती झिंटा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन (Actor Hritik Roshan) मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर शेखर कपूरने दिग्दर्शिक मणिरत्नम यांना शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) आणि मनीषा कोईराला (Actress Manisha Koirala) यांच्या ‘दिल से’ चित्रपटात प्रीती झिंटाला कास्ट करण्याची विनंती केली. या चित्रपटात प्रीती झिंटा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती फक्त 20 मिनिटांसाठी दिसली. लीड हिरोईन म्हणून तिचा पहिला चित्रपट ‘सोल्जर’ हा होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता बॉबी देओल (Boby Deol) मुख्य भूमिकेत होता.
IPLमध्ये खरेदी केला संघ –
2003 मध्ये ‘कोई मिल गया’ आणि 2004 मध्ये ‘वीर जारा’ या चित्रपटातून प्रीतीला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटांच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण काही वर्षांनी ती मोठ्या पडद्यापासून दूर झाली आणि तिने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आपल्या संघाची धुरा सांभाळली. 2008 मध्ये प्रितीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) ही क्रिकेट टीम खरेदी केली. 2009 पर्यंत प्रीती ही एकमेव महिला होती जिच्याकडे संघ होता. दरम्यान, प्रीती झिंटाने यूएसमध्ये राहणारा बॉयफ्रेंड जेन गुडइनफशी लग्न केले आणि नुकतीच ती दोन मुलांची आई झाली. तिने सरोगसीद्वारे दोन मुलांना जन्म दिला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या