Top Recommended Stories

Highest Paid Marathi Actors: 'हे' आहेत मराठी मालिकांमधील सर्वात महागडे अभिनेते; एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन

Highest Paid Marathi Actors: मराठी टीव्हीवर सध्या एकापेक्षा एक सरस मालिका सुरू आहेत आहेत. मराठीतील काही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात अभिनेता स्वप्नील जोशीची 'तू तेव्हा तशी' आणि श्रेयश तळपदेची 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांचा समावेश आहे.

Updated: March 29, 2022 10:04 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Highest Paid Marathi Actors: 'हे' आहेत मराठी मालिकांमधील सर्वात महागडे अभिनेते; एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन

Highest Paid Marathi Actors: मराठी टीव्हीवर सध्या एकापेक्षा एक सरस मालिका (Marathi Serial) सुरू आहेत आहेत. मराठीतील काही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात अभिनेता स्वप्नील जोशीची (Actor Swapnil Joshi) ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) आणि श्रेयश तळपदेची (Shreyas Talpade) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकांचा समावेश आहे. या दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. दोन्ही अभिनेते मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात हे जाणून घेऊया…

मराठी मालिकांच्या लोकप्रियतेमध्ये गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. स्वप्नील जोशी आणि श्रेयश तळपदे हे देखील मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्याकडे वळले आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाने मराठी मालिकांमध्ये एक वेगळी शैली आणली आहे. त्यांच्या अभिनयामुळे मराठी मालिकांची लोकप्रियता अधिक वाढली आहे. हे दोन्ही अभिनेते मराठी मालिकांमधील साध्याचे सर्वात महागडे अभिनेते आहेत.

You may like to read

काही दिवसांपूर्वी झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सुरु झाली. मालिकेची कथा आणि श्रेयश तळपदे व इतर कलाकारांच्या अभिनयामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस तळपदेने अनेक वर्षांनंतर मराठी मालिकेत पुनरागमन केले आहे. दुसरीकडे नव्याने सुरु झालेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. जबाबदारी आणि कर्तव्य यामुळे राहून गेलेले प्रेम हा या मालिकेचा विषय आहे. या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील जोशीने देखील अनेक वर्षानंतर मराठी मालिकांमध्ये पुनरागमन केले आहे.

किती घेतात मानधन

मराठी चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्वप्नील जोशी आणि श्रेयस तळपदे यांचे नाव आहेच. मात्र आता हे दोघे मराठी मालिकांमध्ये देखील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते देखील बनले आहेत. रिपोर्टनुसार मराठी मालिकांमधील सध्याचे सर्वाधिक मानधन स्वप्नील जोशी आणि श्रेयश तळपदे घेत आहेत. याबाबत मराठी सिरियल्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरु पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार स्वप्नील जोशी एका एपिसोडसाठी 60 ते 70 हजार रुपये मानधन घेतो तर श्रेयस तळपदे एका एपिसोडसाठी 40 ते 45 हजार रुपये मानधन घेतो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.