Top Recommended Stories

Hiropanti 2: चाहत्यांच्या गराड्यात टायगरने धरला ठेका, व्हिडिओला यूजर्संचा तुफान प्रतिसाद

Hiropanti 2 : टायगर श्रॉफचा आगामी हिरोपंती-2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान टायगरने चाहत्यांच्या गर्दीत डान्सचा ठेका धरला. या क्षणाचा एक व्हिडिओ त्याने कूवर शेअर केला आहे. या व्हिडिओला यूजर्संचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Published: April 25, 2022 7:15 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Hiropanti 2: चाहत्यांच्या गराड्यात टायगरने धरला ठेका, व्हिडिओला यूजर्संचा तुफान प्रतिसाद
Hiropanti 2

Hiropanti 2 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या अभिनयासोबतच जबरदस्त अॅक्शन सीन्स (Action) आणि अग्रेसिव्ह डायलॉगसाठी प्रसिद्ध आहे. हिरोपंती या हिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood film) पदार्पण केल्यानंतर टायगरने अनेक चित्रपटांतून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता त्याचा आगामी हिरोपंती-2 चित्रपटाची चाहते वाट पाहत आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. हिरोपंती प्रमाणेच त्याच्या सिक्वेलमध्येही टायगरचा रोमान्स, अॅक्शन आणि फाइट पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. येत्या 29 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात टायगरसोबत बॉलिवूडची तरुण आणि सुंदर अभिनेत्री तारा (Tara Sutaria) सुतारिया दिसणार आहे.

टायगरने काही दिवसांपूर्वी हिरोपंती-2 चे ट्रेलर शेअर केले होते. त्याला सोशल मीडिया यूजर्संनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता टायगरने या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो चाहत्यांच्या गराड्यात डान्स मूव्ह्ज (Tiger Shroff Dance) करताना दिसत आहे. त्याच्या या डान्सवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

You may like to read

‘हिरोपंती 2’ चा दुसरा ट्रेलर 23 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरप्रमाणेच यातही टायगरचे अॅक्शन आणि डायलॉग्स पाहायला मिळत आहेत. ट्रेलरमध्ये अॅक्शनसोबत रोमान्स आणि इमोशनही पाहायला मिळाले. ‘हिरोपंती 2’ मध्ये टायगर (बबलू), नवाजुद्दीन सिद्दीकी (लैला) आणि तारा सुतारिया (इनाया) प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात सायबर क्रिमिनल लैला आणि बबलू यांच्यातील सघर्ष दाखवण्यात येणार आहे. तर तारा सुतारिया टायगर श्रॉफच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. अहमद खान दिग्दर्शित ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट 29 एप्रिलला म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.