Top Recommended Stories

Hridaynath Mangeshkar Hospitalised : लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल!

Hridaynath Mangeshkar Hospitalised : लतादीदींचे मोठे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान हृदयनाथ यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर (Aadityanath Mangeshkar) यांनी सांगितले की, त्यांचे वडील रुग्णालयात दाखल आहेत.

Published: April 25, 2022 9:27 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

hridaynath mangeshkar
hridaynath mangeshkar

Hridaynath Mangeshkar Hospitalised : दिवंगत बॉलिवूड गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratna Lata Mangeshkar) यांच्या कुटुंबाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Deenanath Mangeshkar Award) देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताचे पहिले नागरिक आहेत. हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर मंगेशकर कुटुंबाकडून मोठी बातमी समोर येत आहे. लतादीदींचे मोठे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान हृदयनाथ यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर (Aadityanath Mangeshkar) यांनी सांगितले की, त्यांचे वडील रुग्णालयात दाखल आहेत.

Also Read:

पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करताना आणि पाहुण्यांना संबोधित करताना आदित्यनाथ मंगेशकर म्हणाले की, त्यांचे वडील हृदयनाथ मंगेशकर यांना कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करायचे होते. परंतू ते तसे करू शकले नाहीत. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते बरे होत असून आठ ते दहा दिवसांत ते घरी परतणार आहेत.’ पण, आदित्यनाथ यांनी लता मंगेशकर यांच्या भावाला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे याची काहीच माहिती दिली नाही.

You may like to read

‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या मंगेशकर कुटुंबीय आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने पुरस्कार विजेते म्हणून पंतप्रधान मोदींच्या नावाची घोषणा केली होती. ट्रस्टने म्हटले आहे की, ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की प्रथम पुरस्कार विजेते दुसरे तिसरे कोणीही नाहीत तर ते भारताचे पंतप्रधान पीएम मोदी आहेत. दरम्यान, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 25, 2022 9:27 AM IST