Hrithik Roshan Birthday : हँडसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस, वयाच्या सहाव्या वर्षी केली होती अभिनयाला सुरुवात

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आणि हँडसम हंक हृतिक रोशन आज 10 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकने अनेक चित्रपटांमधील आपल्या शानदार व्यक्तिरेखेने आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Published: January 10, 2022 7:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Hrithik Roshan Birthday : हँडसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस, वयाच्या सहाव्या वर्षी केली होती अभिनयाला सुरुवात
Photo Courtesy: Hrithik Roshan Instagram Account

Happy Birthday Hrithik Roshan: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आणि हँडसम हंक (Handsome hunk) हृतिक रोशन आज 10 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस (Hrithik Roshan Birthday) साजरा करत आहे. हृतिकने अनेक चित्रपटांमधील आपल्या शानदार व्यक्तिरेखेने आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या वर्षी तो आपला 48वा वाढदिवस (48th Birthday) साजरा करत आहे. हृतिक रोशन हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचा मुलगा आहे.

Also Read:

हे फार कमी लोकांना माहित आहे की हृतिकने बालकलाकार (Child artist) म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण (Bollywood debut) केले होते. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटात वयाच्या सहाव्या वर्षी तो पहिल्यांदा दिसला होता. यानंतर त्यांने ‘आप के दिवाने’ (1980), ‘आस-पास’ (1981) या चित्रपटांमध्ये देखील बालकलाकार काम केले. या चित्रपटांमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

यानंतर हृतिक रोशन अभ्यासामुळे अभिनयापासून दूर गेला आणि अनेक वर्षांनंतर तो मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर परतला. हृतिकने 2000 साली प्रदर्शित झालेल्या कहो ना… प्यार है चित्रपटामधून मुख्य अभिनेता म्हणून अभिनय कारकिर्दीला (Acting career) सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती. (Hrithik Roshan Birthday: ‘Handsome hunk’ Hrithik Roshan’s birthday today, at the age of 6 he started acting)

‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट हिट ठरला. हृतिक आणि अमिषा ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. हा चित्रपट हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. फार कमी लोकांना माहिती आहे की राकेश रोशन यांना ‘कहो ना प्यार है’ शाहरुख खानसोबत बनवायचा होता. परंतु काही कारणास्तव ते होऊ शकले नाही.

‘कहो ना प्यार है’ चित्रपट हिट झाल्यानंतर हृतिक रोशनने मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामं केले आहे. ‘कोई मिल गया’, ‘धूम 2’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘काबिल’ आणि ‘सुपर 30’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने मोठ्या पडद्यावर आपली छाप सोडली. हृतिकला त्याच्या अभिनयासाठी सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपटांव्यतिरिक्त हृतिक रोशन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 2014 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला. तेव्हापासून दोघेही एका चांगल्या मित्राप्रमाणे एकत्र वेळ घालवत आहेत. याशिवाय अभिनेत्री कंगना राणौतमुळेही हृतिक रोशन अनेकदा वादात सापडला आहे. कंगनाने त्याच्यावर अफेअर करून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हृतिक आणि कंगनाचा हा वाद आजही चर्चेत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 7:00 AM IST