Sayali Kamble Wedding: 'इंडियन आयडॉल 12' फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात, लग्नाचे व्हिडिओ व्हायरल!
Sayali Kamble Wedding: रविवारी सायलीने महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न केले. अतिशय धुमधडाक्यात सायलीचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला सायलीचे इंडियन आयडलमधील बेस्ट फ्रेंड्स उपस्थित होते. सायलीच्या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

Sayali Kamble Wedding: ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) फेम सायली कांबळे (Sayali Kamble) विवाहबंधनात अडकली आहे. सायलीने तिचा प्रियकर धवलसोबत 24 एप्रिल रोजी लग्न (Sayali Kamble Wedding) केले. 19 डिसेंबर रोजी सायलीचा साखरपुडा झाला. त्यानंतर हळद, मेहंदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी सायलीने महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न केले. अतिशय धुमधडाक्यात सायलीचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला सायलीचे इंडियन आयडलमधील बेस्ट फ्रेंड्स उपस्थित होते. सायलीच्या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
Also Read:
- Nag Nagin Live Pranay Video: नाग-नागिणीचा प्रणय तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून व्हाल मंत्रमुग्ध
- Disha Patani Latest Bikini Pics: दिशा पाटनी पुन्हा एकदा बिकिनी अवतारात चाहत्याच्या भेटीला, दिल्या किलर पोझ
- Nagpur Crime: अत्यंत घृणास्पद! नागपूरमध्ये कुत्रीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला बेड्या
सायली कांबळे सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसांपासून सायलीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. सायलीच्या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सायलीचा खास मित्र आणि इंडियन आयडॉलचा 12चा स्पर्धक निहाल तौरोने सायलीच्या लग्नाचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सायलीने लग्नामद्ये पिवळ्या रंगाची पारंपरिक महाराष्ट्रीयन काठपदराची साडी नेसल्याचे दिसत आहे. तर धवलने पेशवाई स्टाईल ड्रेसिंग केली आहे. दोघेही या ड्रेसिंगमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. सायलीचे प्रिवेडिंग फोटोशूट, व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो आणि व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाले होते. आता सायलीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडयावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. दरम्यान, सायली कांबळेने इंडियन आयडॉल संपल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, धवलसोबत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.